Homeशहरकर्कश डीजे अंगविक्षेप करत अत्यंत दर्जाहीन गाण्यावर थिरकत विवीध मंडळाचे गणपती...

कर्कश डीजे अंगविक्षेप करत अत्यंत दर्जाहीन गाण्यावर थिरकत विवीध मंडळाचे गणपती आगमन…तर काही ठिकाणी पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक वेशभूषेत गणपती स्थापना…

advertisement

अहमदनगर दि. 20 सप्टेंबर
अहमदनगर शहरात अनंत चतुर्थीच्या दिवशी लाडक्या गणरायाचे घरोघरी मोठ्या उत्साहात स्वागत झाले त्याचबरोबर शहरातील विविध सार्वजनिक गणपती उत्सव मंडळाकडूनही ठिकठिकाणी चौका चौकात गणपतीची स्थापना करण्यात आली महानगर पालिकेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेवते असल्याने या गणपती उत्सवात आपली राजकीय ताकद दाखवण्यासाठी यावर्षी अनेक भावी नगरसेवकांनी गणपती उत्सवा दरम्यान मोठमोठे डीजे लावल्याने त्यावर तरुणाई थिरकत होती.

मात्र गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता म्हणून आपण त्यांची पूजा करतो स्थापन करतो मात्र या गणपती बाप्पाच्या आगमच्या आगमनाच्या दिवशी मात्र आता चित्र अत्यंत वेगळे दिसू लागले आहे बाई मी केळेवाली,आ अंटे, पाव्हणं जेवलात का , किसमे कितना है दम,अशा अत्यंत द्विअर्थी गाण्यावर अत्यंत कर्कश डीजे वाजवत बेशरम पणे अंगविक्षेप करून आणि दारू पिऊन तरुणाई नाचत होती. गणपती उत्सव नेमका कशासाठी असतो हेच अजून काही लोकांना कळत नसल्याने गणपती आगमनाच्या दिशेने भरपूर दारू ढोसून अंगविक्षेप करत नाचणे एवढेच या तरुणांना समजत असते.
शहरात अत्यंत कर्कश आवाजात डीजे वाजत होते संपूर्ण शहर डीजेच्या आवाजाने दणाणून गेले होते मात्र याकडे फक्त पहाण्याव्यतिरिक्त पोलीस प्रशासन काहीच करत नव्हते कारण त्यांचेही हात बांधले गेल्याच अनेक ठिकाणी दिसून आलं कारण सर्वच गणपती उत्सव मंडळ हे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाच्या अधिपत्याखाली असल्यामुळे पोलिसांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली होती.

मात्र हे होत असताना दुसरीकडे एक चांगलं चित्रही पाहायला मिळालं पारंपारिक ढोल ताशाच्या गजरात आणि पारंपारिक वेशभूषेत काही ठिकाणी गणपती आगमन करण्यात आले नगर शहरात अनेक नवीन ढोल वादक पथक निर्माण झाल्याने अनेक गणपती उत्सव मंडळात ढोल पथक तसेच पारंपारिक वेशभूषांमध्ये अनेक महिला मुली तरुण दिसून आले.

याचबरोबर संध्याकाळी काही ठिकाणी दोन मंडळाच्या वादामधून डोके फोडाफोडी झाल्याच्या घटना नगर शहरात घडल्या मात्र अनेक ठिकाणी आपसात प्रकरण मिटल्यामुळे हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलेले नाहीत. मात्र आज ना उद्या पुन्हा अशा घटना डोके वर काढणार असल्यामुळे पोलिसांना आता दहा दिवस डोळ्यात तेल घालून शहरात बंदोबस्त करावा लागणार आहे कारण निवडणूक असल्यामुळे अनेक ठिकाणी राजकीय धमसान होत असल्याने पोलिसांसमोर आता शांतता राखणे एक मोठे आवाहन असणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular