अहमदनगर दिनांक २० सप्टेंबर
अहमदनगर शहरातील एमआयडीसी पोलिसांनी शेंडी परिसरात चोरीच्या तब्बल पाच मोटरसायकली आणि
१६ मोटारसायकलीचे सुटटे केलेले पार्ट, इजिंन व चेसी असा दोन लाख तेरा हजार रुपयांचा मुददेमाल जप्त केला आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सह्य्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना मिळालेल्या माहितीनुसार
नगर औरंगाबाद रोडवरील कृष्णा ॲटो कन्सटल्ट येथे काही मोटारसायकली व व मोटारसायकलचे खोललेले इंजिन चेसी व इतर साहित्य असुन ते चोरीचे असण्याची शक्यता आहे. सायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप आणि एमआयडीसी पोलीस स्टेशन, पोहेकॉ महमंद शेख, पोहेकॉ थोरवे, पोहेकॉ अनिल आव्हाड, पोहेकॉ फकीर शेख, पोना/दिपक गांगर्डे पोना राजु सुद्रीक, पोना भागवत पोकॉ/किशोर जाधव, पोकॉ तांदळे, पोकॉ दहिफळे, पोकॉ वंजारी यांच्या पथकाने कृष्ण ॲटो कन्सल्टी येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी असलेल्या पाच मोटारसायकली व 17 मोटारसायकलचे सुटटे केलेले पार्ट सापडले.
कृष्ण ॲटो कन्सल्टीचा दुकान मालक पांडुरंग गोविंद
शिंदे यांचेकडे त्यांचे कागदपत्राची मागणी केली असता त्यांचेकडे कसलेही बिले तसेच मोटारसायकलचे कागदपत्रे मिळुन आले नाही. त्यानंतर अधिक चौकशीत ही सर्व चोरीच्या मोटरसायकली आणि त्याचे स्पेअर पार्ट असल्याचे पोलीस तपासात समोर आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात पांडुरंग गोविंद शिंदे वय – 55 वर्ष रा. शेंडी ता.जि. अहमदनगर याचे विरुदध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.