अहमदनगर दि.१८ सप्टेंबर
नगर शहरातील दिल्ली गेट परिसरात एक विवाहित तरुणी आपल्या मैत्रिणीबरोबर घराबाहेर गप्पा मारत असताना या प्रकरणातील आरोपी फैजान कलीम बागवान हा त्या विवाहित तरुणीच्या अंगावर दुचाकी गाडी घालून तिला लज्जा उत्पन्न होईल असे हावभाव करून अश्लील शब्द वापरत तू मला आवडतेस गाडीवर बस गाडीवर बसली नाहीस तर तुझ्या अंगावर अॅसिड (acid ) टाकेल असा दम दिल्याची घटना घडली असून याप्रकरणी विवाहित तरुणीणीच्या फिर्यादी वरून तोफखाना पोलीस स्टेशन (Tofkhana police station) मध्ये फैजान कलीम बागवान याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजान कलीम बागवान हा सराईत गुन्हेगार असून या आधी त्याच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत. तोफखाना पोलीस स्टेशन आणि कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये (Kotwali police station ) 2011 पासून सात विविध गंभीर होणे दाखल असून मध्यंतरीच्या काळात तारकपूर परिसरातही त्याला असे छेडछाड करताना पकडण्यात आले होते त्यावेळेसही नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले होते.
ही घटना घडल्यानंतर तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये अनेक हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, शिंदे गटाचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, काका शेळके तसेच भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली होती. या प्रकरणी आता सोमवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून या गुन्हेगारावर कडक कारवाई करावी या मागणी करता शिवसेनेतर्फे शिष्ट मंडळ जाणारा असून नगर शहरात अशा छेडछाडीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत असून काही टार्गेट मुले ठराविक मुलींना टार्गेट करून छेडछाड करत असल्याची घटना घडत आहेत.याबाबत सविस्तर निवेदन उद्या पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार आहे.