मुंबई दिनांक 11 ऑक्टोबर
मागील दोन वर्षात कोरोना काळात आरोग्य कर्मचारी आणि त्यांच्या साथीने जो या कठीण काळात रस्त्यावर उभा होता तो म्हणजे पोलीस. मात्र या पोलिसांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते पोलिसांची ड्युटी 24 तास असते सुट्टी ही नावालाच असते कारण पोलिसा ऑन ड्युटी 24 तास कामावरच असतो. कोणताही सण,उत्सव असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो घरातील भांडण असो वा गल्लीतील भांडण असो पोलिसाला तेथे उभे राहवेच लागते मात्र याच पोलिसाच्या हक्कासाठी कोणी कधी आवाज उठवलेला दिसत नाही.
आता पोलिसांच्या बोनसच्या प्रश्नावर महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना आक्रमक झाली असून पोलिसांना दिवाळीचा बोनस मिळावा अशी मागणी बीड येथील महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.आरोग्य कर्मचारी, मुंबईमधील बेस्ट कर्मचाऱ्यांना तसेच महसूल कर्मचाऱ्यांना मागील काळात बोनस दिले गेले आहे. मागच्या वर्षी पोलिसांना फक्त दोन हजार रुपये दिवाळी बोनस दिला गेला होता. पोलिसांची कोरोना काळातील कामगिरी मोठी असून अनेक पोलीस आपल्या कर्तव्यावर असताना कोरोना संक्रमणामुळे मृत्युमुखी पडले आहेत.मात्र याकडे कुणी ढुंकूनही पाहत नाही सदैव रक्षणासाठी उभा राहणाऱ्या पोलिसाला बोनस देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारने पोलीस बांधवांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र बॉईज पोलीस संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.