अहमदनगर
अहमदनगर शहरातील गुलमोहर रोड परिसरातील असलेल्या किर्लोस्कर कॉलनी मध्ये दोन अज्ञात लोकांनी बन्सी महाराज मिठाईवाले चे संचालक धीरज जोशी यांच्यावर प्राण घातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात धीरज जोशी हे गंभीर जखमी झाले असून हल्ल्याच्या ठिकाणी एक तलवार आणि गावठी पिस्टल सापडून आले आहे मात्र हा हल्ला कशामुळे झाला हे अद्याप कळले नसून तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी पोहचले आहे. म दहाच्या सुमारास ही घटना घडली असून घटनास्थळी रक्ताचे थारोळे साचले आहे.
ही घटना कळताच अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी तातडीने घटनास्थळी गाव घेतली.. जखमीला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
बातमी अपडेट होत राहील वाचत रहा