अहमदनगर दि .९ फेब्रुवारी
परीक्षेत पैकी च्या पैकी मार्क हवे असेल तर मला काहीतरी दे असे म्हणत सरांनी केला विद्यार्थिनीचा विनयभंग नगर शहरातील नावाजलेल्या एका शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला असून या बाबत तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून सतिष शिर्के याच्याविरुद्ध ३५४, ५०४, बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर मधील एका नामांकित महाविद्यालयात 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनींला सतिष शिर्के याने केबीनमध्ये बोलावुन घेतले व तुला प्रक्टिकल मध्ये 20 पैकी 20 मार्क पाहिजे असेल तर तु मला काय देशील असे म्हणाला त्यानंतर ती विद्यार्थिनी घाबरून तिथून निघून गेले मात्र सतीश शिर्के याने वेळोवेळी त्या विद्यार्थ्यांना त्रास देण्याच्या उद्देशाने मार्क पाहिजे असेल तर मला काहीतरी दे असा तगादा लावला होता.
त्यानंतर प्रॅक्टिकल मध्ये व्यवस्थित पेपर सोडवूनही शिर्के याने त्या विद्यार्थिनीला शून्य मार्क दिले याबाबत ती विद्यार्थिनी शिर्के यास कारण विचारण्यात गेली असता शिर्के याने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केली त्यामुळे ती मुलगी घाबरून तिथून पळून गेली मात्र ही गोष्ट तिने घरच्यांना सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत त्या लिंग पिसाट शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.