Homeक्राईम‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती अहमदनगर मध्ये दरमहा कोटींची उलढाल; हप्तेखोरी, पोखरलेल्या यंत्रणेमुळे...

‘गुटखा बंदी’ केवळ नावापुरती अहमदनगर मध्ये दरमहा कोटींची उलढाल; हप्तेखोरी, पोखरलेल्या यंत्रणेमुळे राजरोस विक्री अहमदनगर जिल्ह्यात येणारे 65 लाख कोणाचे ?

advertisement

अहमदनगर दि.१८ नोव्हेंबर
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात गुटखा बंदी करण्यात आली. गुटखाबंदी झाल्यानंतर सुरुवातीला काही काळ गुटखा उत्पादक धास्तावले होते. मात्र, गुटखा उत्पादक, विक्रेत्यांनी समांतर व्यवस्था उभी करून बेकायदा गुटखाविक्रीचे जाळे निर्माण केले. परराज्यातील कर्नाटक भागातून अहमदनगर जिल्ह्यात गुटखा विक्रीसाठी पाठविला जातो. हप्तेखोरी, पोखरलेल्या यंत्रणेमुळे गुटखा विक्री राजरोस सुरू असून एकटय़ा अहमदनगर शहर परिसरात बेकायदा गुटखा विक्रीतून अंदाजे चारशे कोटींची उलढाल दरमहा होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

शालेय, महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये गुटखा सेवनाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर होते.त्यामुळे गुटखा बंदी लागू करण्यासाठी आघाडी सरकारने प्रयत्न केले. त्या वेळी अनेक गुटखा उत्पादकांनी राज्य सरकारावर दबाब आणण्याचा प्रयत्न केला होता. न्यायालयाने गुटखा बंदी लागू करण्याचे आदेश दिले. त्या वेळी राज्य सरकारने गुटखाविक्रीतून मिळणाऱ्या कोटय़वधी रुपयांचा महसुलावर पाणी सोडले होते. गुटखा बंदीला अनेक वर्ष झाली आहेत. मात्र, प्रत्यक्षात वेगळीच परिस्थिती आहे. गुटखा बंदी नावापुरती आहे. खेडापाडय़ापासून ते मोठय़ा शहरात गुटखा सहजपणे उपलब्ध होते. गुटखा उत्पादक, बेकायदा वितरक, विक्रेते यांनी गुटखा विक्रीची समांतर यंत्रणा उभी केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात असा चालतो गुटखा व्यापार

अहमदनगर जिल्ह्यात गुटखा विक्री साठी कर्नाटक मधून रोशनच्या मद्यमातून बंदी असलेला गुटका अहमदनगर जिल्ह्यात आणला जातो.आणि रोशन च्या मद्यमातून बीड,नाशिक,औरंगाबाद, जालना मध्ये माल पोहीच केला जातो.या मध्ये प्रामुख्याने संगमनेर कोपरंगाव च्या विजू आपला हातखंडा वापरून चोपडून माल भरतो आणि त्याच बरोबर श्रीरामपूरचा रफिक, हरून ,सलमान,लोणीचा घोलप, यांच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात बेकायदेशीर बंदी असलेला गुटखा पोहोचवला जातो नगर शहरात नावेद हा मोठा डीलर असून त्याला राजकीय वरहस्त असल्याने तो नगर शहरात माल सप्लाय करतो शहराच्या मध्यवस्तीत मोठे गोडाऊन असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच भिंगार येथेही एक मोठे गोडाऊन असून त्या ठिकाणी नूर याचे अधिराज्य आहे.

हा गुटखा महाराष्ट्रामध्ये कर्नाटक मधून सोलापूर मार्गे अहमदनगर जिल्ह्यात विक्रीसाठी पाठविला जातो. रोशन नामक वाहतूकदाराकडून कंटेनरने गुटखा विक्रीसाठी आणला जातो तेथून गुटख्याचे पुढें शहरातील उपनगरातील किरकोळ विक्रेत्यांकडे पाठविले जातात. फेरीवाले त्यांच्याकडून गुटखा खरेदी करून पानपट्टीचालकांना विकतात. अहमदनगर शहरात महिन्यातून चार ते पाच कंटेनरमधून गुटखा विक्रीसाठी आणला जातो. एका कंटनेरमधून साधारणपणे पन्नास लाखांचा माल विक्रीसाठी  आणला जातो. अहमदनगर गुटखा विक्रीचा हिशोब केल्यास दरमहा दोन तीनशे कोटी रुपयांची उलढाल होते.

यंत्रणा पोखरलेली

गुटखा बंदीचा आदेश नावापुरता आहे. जुजबी कारवाई करून गुटखा विक्रेते आणि उत्पादकांमध्ये दहशत निर्माण करायची आणि त्या बदल्यात गुटखा उत्पादकांकडून हप्ते घ्यायचे. प्रशासकीय विभागातील काहींच्या छुप्या पाठिंब्यावर अहमदनगरसह राज्यभरात गुटखा विक्रीचे जाळे निर्माण करण्यात आले आहेत. हप्तेखोरीमुळे संपूर्ण यंत्रणा पोखरली असून गुटखा बंदी कागदावर असल्याची माहिती गुटखा विक्रेत्यांकडून देण्यात आली.

दर महिन्याला 65 लाख

कर्नाटक मधून अहमदनगर जिल्ह्यात येणारा गुटखा पुढे बीड औरंगाबाद जालना या जिल्ह्यात पाठवला जातो यासाठी गुटखा कंपनीकडून 65 लाख रुपये दर महिन्याला दिले जातात. अशी ही खात्रीशीर माहिती मिळाली असून हे 65 लाख रुपये नेमके कोणाच्या खिशात आणि कोणा कोणाच्या वाट्याला जातात त्याची यादी समोर आली आहे. अनेक जण या 65 लाख रुपयांच्या वाट्यामध्ये सामील आहेत.

अवैद्य गुटखा विक्रीला राजकीय आश्रय असल्यामुळे सहसा मोठ्या कारवाया फार क्वचित होताना दिसतात मात्र दाखवण्यासाठी छोट्या मोठ्या करवाया नेहमीच होत राहतात परंतु यामध्ये आतापर्यंत मोठ्या मोहरक्यापर्यंत पोलिस यंत्रणा कधीच पोहोचली नाही हे तेवढेच सत्य आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये अहमदनगर शहरातील एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात गुटखा पकडण्यात आला होता त्यावेळी चांगलाच गजहब झाला होता मात्र त्यावेळी सुद्धा मोरहक्यापर्यंत पोहोचण्यात पोलीस अपयशी ठरले होते.

१७,४१३ चौरस किलोमीटर मध्ये पसरलेल्या अहमदनगर जिल्ह्यात 14 तालुके असून प्रत्येक तालुक्यात अकोले एक नंबर 3 लाख 2 नंबर 1 लाख आशा प्रमाणे वाटप होते.यामध्ये कर्जत,कोपरगाव,जामखेड,नगर, नेवासा , पाथर्डी,पारनेर, राहाता, राहुरी, शेवगांव,श्रीगोंदा,श्रीरामपूर संगमनेर यांचा समावेश आहे. संगमनेर श्रीरामपूर वर विशेष महेरबानी असते. जिल्ह्याच्या ठिकाणी यापेक्षाही मोठी मेहरबानी असते ही मेहेरबानी नाशिक पर्यंत जात असल्याचेही माहिती मिळते. तर औषधाला फक्त दहा लाखातच गार करून बाकीचे मेहेरबानी इतरत्र वळवली जाते त्यामुळे औषध कधीही आपला प्रभाव दाखवत नाही

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular