HomeUncategorizedमंत्री आमदार नसूनही जिल्हा भाजपमध्ये शिवाजी कर्डीले यांचाच बोलबाला केंद्रा पासून राज्य...

मंत्री आमदार नसूनही जिल्हा भाजपमध्ये शिवाजी कर्डीले यांचाच बोलबाला केंद्रा पासून राज्य पर्यंतचे सर्वच दिग्गज नेत्यांची कार्डिलेच्या निवस्थानी भेट काय आहे ही जादू

advertisement

अहमदनगर दि.२० नोव्हेंबर
शिवाजी कर्डिले एक दूध विक्रेते ते मंत्री पदापर्यंतची त्यांची मजल हा माजी मंत्री माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा राजकीय प्रवास नक्कीच थक्क करणारा आहे. मात्र त्याचबरोबर राजकीय अस्तित्व टिकवणे हे सुद्धा मोठे जिकरीचे काम आहे ते काम अहमदनगर जिल्ह्यात फक्त भाजपचे नेते शिवाजी कर्डिलेच करू शकतात हे त्यांनी वारंवार सिद्ध केलं आहे.सत्तेत असो अथवा सत्ते बाहेर असो शिवाजी कर्डिले यांच्या राजकीय चाणक्या नितीमुळे सर्वच नेत्यांना शिवाजी कर्डिले यांच्याकडे शरण यावच लागते ही वस्तुस्थिती आहे.मग ती सोसायटीची निवडणूक ,बाजार समितीची निवडणूक असो की जिल्हा बँकेची निवडणूक असो अथवा एखाद्या त्यांच्या मतदारसंघातील साखर कारखान्याची निवडणूक असो जिल्हा परिषद आणि अहमदनगर महानगर पालिकेच्या राजकारणात अनेक अशक्य गोष्टी शिवाजी कर्डिले यांनी शक्य करून दाखवल्या आहेत. तर शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात नगर तालुक्यात सर्व पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवत असतात मात्र शिवाजी कर्डिले यांची चाणक्य नीति नेहमीच सर्वच पक्षांना पुरून उरते हे अनेक वेळा निवडणुकीतून दिसून आले आहे.

आजकालच्या कार्पोरेट राजकारणात डोक्यावर गांधी टोपी शर्ट पायजमा आणि चप्पल घालणारा नेता ही राजकारणाची वेगळी ओळख आजही शिवाजी कर्डिले यांनी टिकून ठेवली आहे. कधीही कोणता बडेजाव त्यांच्या कृतीतून दिसून येत नाही. त्यांच्या निवासस्थानी रोज सकाळी भरणारा दरबार हा अनेक राजकीय नेत्यांना चकीत करणारा आहे. आमदार नसतानाही मंत्री नसतानाही आणि सत्ता नसतानाही त्यांचा दरबार हा वर्षानुवर्षे सुरूच आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत राहुरी नगर मतदार संघातून शिवाजी कर्डिले यांचा निसटता पराभव झाला मात्र पराभव झाल्यानंतरही जिल्ह्यात चर्चेचा विषय राहिले ते शिवाजी कर्डिलेच राहुरी मतदार संघाचे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार प्राजक तनपुरे यांना मंत्रिपद भेटूनही अडीच वर्षात राहुरी मतदार संघात शिवाजी कर्डिले हेच प्रकाश झोतात राहिले.

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर विद्यमान खासदारांच्या विरोधात तक्रार करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे जाणारे आणि स्पष्ट शब्दात जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती सांगणारे हे शिवाजी कर्डिलेच होते.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे अहमदनगर जिल्ह्यादौऱ्यावर आले असताना त्यांनीही शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी भेट देऊन कर्डिले यांचा पाहुणचार घेतला. त्यानंतर केंद्रीय कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांनीही शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाहुणचार घेतल्याचे सर्व जिल्हावासियांनी पाहिले आहे. त्याचबरोबर शिवाजी कर्डिले यांच्या घरी मंत्री येणे हे आता नवीन राहिले नाही. सत्ता असो किंवा नसो शिवाजी कर्डिले यांच्या निवासस्थानी आजपर्यंत राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांनी भेटी दिल्या आहेत. राजकीय वर्तुळात मुरब्बी चाणक्य म्हणून शिवाजी कर्डिले यांची ओळख आहे त्याच जोरावर सत्तेत नसतानाही शिवाजी कर्डिले यांच्या भोवतीच भाजपचे राजकारण फिरत असते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular