छत्रपती संभाजीनगर दि. १० जानेवारी
नायलॉन मांजाच्या घातक औरंगाबाद खंडपीठाने
मंगळवारी गांभीर्याने दखल घेतली. बंदी असलेल्या मांजा जप्तीसाठी पोलिसांनी राज्यभर कोम्बिंग ऑपरेशन राबवावे, असे आदेश न्या. रवींद्र घुगे व न्या. वाय. जी. खोब्रागडे यांनी दिले. मागील वर्षी ४४, तर
या वर्षी ८ केवळ ८ कारवायांबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासन गंभीर नसल्याचे खडे बोलही सुनावलेà आहे.
नायलॉन मांजा हा दुकान, घर, मैदान, खासगी मालमत्तेत सापडेल, ते ठिकाण सील करावे. अल्पवयीन मुलाकडे नायलॉन मांजा कुठून आणला याची माहिती लपवली तर त्याच्या पालकांवर गुन्हा
दाखल करावा. घरावर पतंग उडवणाऱ्यावर नजर ठेवावी. तसेच त्यांच्यावर कारवाई संबंधित मालमत्ताधारकांना विचारून करावी असेही न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
मात्र अहमदनगर शहरात अजूनही नायलॉन मांजा चोरीछुपे विक्री होत आहे. महानगरपालिकेने यासाठी एक पथक नेमून दिले आहे तसेच नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याची माहिती देणाऱ्याला पाच हजार रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले आहे. मात्र तरीही अद्याप पर्यंत चायना मांजा विक्रीला आळा बसलेला नाही त्यामुळे आता महानगरपालिकेने पोलीस प्रशासनाची मदत घेऊन कोंबींग ऑपरेशन राबवणे गरजेचे आहे. तरच हा नायलॉन मांजा नष्ट होऊ शकतो.