Home Uncategorized महामार्गा वर जबरी चोरी करणा-या लुटारूंच्या भिंगार कॅम्प पोलीसांनी अवघ्या चोवीस तासांत...

महामार्गा वर जबरी चोरी करणा-या लुटारूंच्या भिंगार कॅम्प पोलीसांनी अवघ्या चोवीस तासांत आवळल्या मुसक्या

अहमदनगर दि.१० जून

८ जून रोजी रात्रीच्या सुमारास कोठला परीसरातून स्टेट बँकेकडे जाताना नवीन उड्डान पुलाच्या जवळ पायी जाणाऱ्या भरत विलास गर्जे यास तीन अनोळखी लोकांनी मोटारसायकल वरून येऊन गर्जे यास आडवून शिवीगाळ, दमदाटी करून त्यांच्या खिशातील रोख रक्कम आणि ओपो कंपनीचा मोबाईल बळजबरीने, चोरून नेला होता या बाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये भा द वि 394,324,323,504,506,34 अन्वय गरजे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करत असताना भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांना मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील एक आरोपी एसबीआय चौक परिसरातील एलआयसी ऑफिस समोर थांबलेला असल्याची माहिती मिळाली त्या माहीतीनुसार भिंगार कॅम्प पोलिसांनी एलआयसी परिसरात जाऊन कविराज शिवराज नायडू (वय21 वर्षे रा.कोंबडीवाला मळा, सोलापुर रोड, अहमदनगर) गॅस ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केल्यानंतर त्यांने गरजे यांना लुटल्याची कबुली दिली या लुटीमध्ये त्याच्यासोबतबअरविंद अशोक पिल्ले( वय 22 वर्षे रा.कवडे नगर, पाण्याचे टाकी जवळ, आलमगीर, भिंगार ता.जि. अहमदनगर ) शाहरूक चांद शेख (वय 22 वर्षे रा. कवडे नगर, आलमगीर, भिंगार ता.जि. अहमदनगर) या दोघांनी मदत केल्याचे सांगितले पोलिसांनी त्यानुसार इतर दोघांचा तपास करून त्यांना ताब्यात घेतल्या असून त्यांच्याकडून सदर गुन्ह्यात वापरलेली 50,000/- रू किं चा एक एच एफ डिलक्स कंपनीची मोटर सायकल नं एम एच 16 बी एस 8936 व रोख रक्कम 1,000/- असा एकून 51,000 /- रू किं चा मुद्देमाल जप्त केला आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे,उप
विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे, सहा. पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, पोसई / मंगेश बेंडकोळी, पोहेकाँ/रेवननाथ दहीफळे, पोहेकाँ/संदिप घोडके, पोना/राहुल द्वारके, पोना/दिलीप शिंदे, पोकाँ/रमेश दरेकर,पोकाँ/अमोल आव्हाड,मपोकाँ/तृप्ती कांबळे यांनी सदरची कारवाई केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version