Home Uncategorized आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या “त्या” फलकाची चांगलीच चर्चा… लाल दिवा...

आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या “त्या” फलकाची चांगलीच चर्चा… लाल दिवा मिळणार ?

अहमदनगर दि.१०जून

अहमदनगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस 12 जून रोजी असल्याने अहमदनगर शहरात ठीक ठिकाणी त्यांच्या शुभेच्छांचे फलक त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावले आहेत. मात्र नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक परिसरातील एक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या फलकावर भावी मंत्री असा उल्लेख करून आमदार संग्राम जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


विशेष म्हणजे या फलकावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही नेत्याचा फोटो नसून पक्षाचाही कुठे उल्लेख केलेला नाही. सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार फक्त शिंदे फडवणीस सरकारचा होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येण्यासाठी 2024 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे भावी मंत्री नेमकं कोणाकडून होणार याबाबत नगर शहरात चांगलीच चर्चा चालू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version