अहिल्यानगर दिनांक 2 जुलै
एक महिन्यापूर्वीच दूधवाल्याला गंडवणाऱ्या सुप्रिया आणि वैष्णवी या दोघींनी तिसगावच्या भैय्या नामक म्होरक्याच्या माध्यमातून नवीन बकरे शोधून त्यांना 15 लाख रुपयांना चुना लावून तंबाखू खाल्ल्याचा प्रकार आहे.

एक महिन्यापूर्वीच नगर शहरातील एका दूधवाल्याला घरी बोलून त्याचे व्हिडिओ काढत त्याला पैसे मागण्याचा प्रकार घडला होता मात्र पोलीस स्टेशन पर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर महिलाच तोंडघशी पडल्या आणि हा प्रकार कसा बसा दाबला गेला होता. मात्र पुन्हा याच दोघींनी पाथर्डी येथील नवीन बकरा शोधून त्यास जवळपास दहा ते पंधरा लाख रुपयांना गंडवले असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
तिसगाव येथील भैया या दोघींचा मोरक्या असून तो या दोघींना बकरे मिळवून देतो आणि त्यानंतर मग त्या दोघी आपल्या पद्धतीने त्या बकऱ्याला कशा पद्धतीने कापायचे याचा प्लॅन करतात आणि याचा शेवट तिसगाव येथील भैय्या बो मध्यस्थी करून पैसे घेऊन मिटून घेण्याचे नाटक करत असतो.
या दोन महिलांचा फंडा असा आहे की आधी कोणत्या ना कोणत्या कारणाने ओळख करून घ्यायची. त्यानंतर पुरुषांकडून मोबाईल नंबर घ्यायचा मिस कॉल द्यायचा मोबाईल नंबर मिळाल्यावर पुरुषांशी जवळीक साधायची मेसेज द्वारे त्यांना घायाळ करायचे आणि निवांत ठिकाणी बोलवून घेऊन त्याचे चोरून व्हिडिओ काढायचे आणि ते व्हिडिओ तिसगावच्या भैय्या बो कडे द्यायचे . त्यानंतर तिसगावच्या भैया बो ची एन्ट्री होते. तो त्या महिलांची आणि संबंधित माणसाची मध्यस्थी करून पैसे लुबाडतो. असा फंडा नगर मध्ये सध्या सुरू असून यामध्ये चांगले चांगले लोक फसले गेले आहेत. मात्र अब्रूचे धिंडवडे उडण्यापेक्षा कुठेही बोंब न करता हे प्रकरणे बाहेरच मिटवून घेण्यात येतात.