Homeविशेषमूर्ती लहान पण कीर्ती महान... काका शेळके यांना वाढदिवसानिमित्त समर्पित लेख

मूर्ती लहान पण कीर्ती महान… काका शेळके यांना वाढदिवसानिमित्त समर्पित लेख

advertisement

जन्म. २६ऑगस्ट १९७७

अहमदनगर शहराच्या राजकारणात अमीट छाप सोडनारे. साधी राहणी, नम्र आणि मवाळ भाषा पण कणखर बाणा आणि सामान्य माणसाशी जोडलेली नाळ यामुळे केवळ जनतेच्या प्रेमाच्या जोरावर आपल्या भाजी विकणाऱ्या आईला थेट महानगर पालिकेचे नगरसेविका बनवणारा तो श्रावण बाळ म्हणजेच अहमदनगर शहरातील राजकीय पलटावर अत्यंत कमी वेळात चमकणारा तारा चंद्रकांत उर्फ काका शेळके.

लहानपणापासूनच वेगळं काही करण्याची आवड आणि त्यामुळेच तरुणपणी त्याकाळी राज्याच्या पलटावर काँग्रेस मधून विभक्त होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरात आपली पाळमुळे रुजवत असताना माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य सुरू केले. नाही नाही म्हणता सर्वसाधारण जनतेच्या वास्तव्याच्या ठिकाणी असणाऱ्या सिविल हडको परिसरात काका शेळके यांनी आपल्या कामामुळे चांगला गोतावळा निर्माण केला.

घरची परिस्थिती अत्यंत साधारण सुरुवातीला घराजवळच छोटे-मोठे व्यवसाय करून जीवन चरित्र भागवत असताना सामाजिक कार्याची आवड असल्याने राजकारणातील प्रवेश आणि त्यामुळे तयार झालेला दबदबा यामुळे 2013 मध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या आईला म्हणजेच कालावतीताई शेळके यांना निवडणुकीत उभे करून भरघोस मतांनी निवडून आणण्याची जादू काका शेळके यांनी करून दाखवली.राजकीय प्रवासात चढउतार होत असतानाच कालांतराने काका शेळके यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना प्रवेशानंतर त्यांच्या राजकारणाला चांगलीच धार आली माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांचे खंदे समर्थक आणि सावेडी उपनगराचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली.

राजकारण म्हटले की चढ उतार आणि आरोप प्रत्यारोप हे होतच राहतात मात्र काका शेळके नेहमीच समाजकारण डोळ्यासमोर ठेवून कार्य करत असल्यामुळे ते नेहमीच चर्चेचा विषय राहिले. महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक विकास कामांची गंगा त्यांनी सिव्हिल हडको परिसरात आणि त्यांच्या प्रभागामध्ये आणली होती. त्यामुळे आज जरी ते नगरसेवक नसले तरी त्यांच्याकडे सामान्य माणूस रोजच काम घेऊन येतो हीच त्यांनी केलेल्या मागील कामाची ओळख निर्माण झाली आहे.

आज त्यांचा 45 वा वाढदिवस साजरा होत असतानाही त्यांच्या समाजकारणाची ओढ दिसून आली. आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी सर्व रोग निदान शिबिर आयोजित करून आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो याची प्रचिती दाखवून दिली. सदैव नागरिकांच्या समस्येसाठी झगडणारा नेता काका शेळके अशी ओळख सिविल आडको परिसरात झालेली आहे. पद असो किंवा नसो मात्र कामामुळे आपली ओळख कशी निर्माण करावी हेच काका शेळके यांच्याकडे पाहिल्यानंतर समजून येतं.

 

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular