HomeUncategorizedउड्डाणपुलावरील गती रोधक ठरतायेत अपघाताची कारण.. विचित्र अपघातात दोन वाहनांचे मोठे नुकसान

उड्डाणपुलावरील गती रोधक ठरतायेत अपघाताची कारण.. विचित्र अपघातात दोन वाहनांचे मोठे नुकसान

advertisement

अहमदनगर दिनांक 26 नोव्हेंबर

अहमदनगर शहरातील नव्यानेच सुरू झालेल्या उड्डाणपुलावरील अपघातांची मालिका थांबता थांबेना असेच दिसून आले आहे. आज सकाळीच एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचार साठी दाखल करण्यात आले आहे.

तर या घटनेनंतर लगेच उड्डाण पुलावरील गतिरोधकांमुळे पुन्हा एकदा अपघात झाला असून या अपघातात दोन वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे गतिरोधक आल्यामुळे पुढच्या वाहनाने वाहन हळू केले मात्र त्याच्या मागून येणाऱ्या ट्रकला वेग कमी करता न आल्याने हा ट्रक चालक थेट वाहनावर जाऊन आदळला त्यामुळे मागोमाग एक अशा तीन वाहनांची धडक होऊन त्यामधील दोन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या अपघातानंतर दोन्ही वाहने प्रथम कोतवाली पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते मात्र उड्डाण पुलावरील काही हद्द भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये येत असल्यामुळे पुढील कारवाईसाठी  भिंगार कॅम्प पोलिसांना कळविण्यात आले आहे.  मात्र उड्डाण पुलावरील चुकीच्या पद्धतीने केलेल्या गतीरोधक मुळे रोजच वाहनांचे अपघात सुरू आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular