Home क्राईम बेकायदेशीर सावकारी करून प्लॉट वर मिळवला ताबा सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल

बेकायदेशीर सावकारी करून प्लॉट वर मिळवला ताबा सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर दि.३ ऑगस्ट
ताबा प्रकारात अवैध सावकारी हा प्रकारही येत असून थोडे थोडे पैसे व्याजाने देऊन अखेर व्याज आणि मुद्दल याची बेरीज करून एखाद्याच्या जागेवर ताबा मारायचा हा प्रकार शहरात फार जुन्या काळापासून चालत आला आहे.

नगर शाहरतील नालेगाव भागातील सिटी सर्व्ह नंबर 48 मधील प्लॅट नंबर ११ चा व्यावहार असाच झाला असल्याचं समोर आले आहे नगर तालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे अभय रामलाल ललवाणी यांनी 9 फेब्रुवारी 2021 च्या सावकारी व्यवहारात दिलेले गहाणखत 8 डिसेंबर 2005 हे रद्द होणेबाबत तक्रार अर्ज दिला होता.या अर्जा नुसार उपनिबंधक सहकारी संस्था नगर तालुका यांनी 28 जुलै 2021 रोजी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 16 अन्वये निर्देश जारी करुन दोन पथकाची नेमणूक केली होती. या पथकाने 29 जुलै 2021 रोजी शिवशंकर भंडारी यांच्या घरी व कार्यालयात जाऊन झडती घेतल्या नंतर तेथून प्राप्त झालेले कागदपत्र व पंचनामा उपनिबंधक सहकारी संस्था नगर तालुका कार्यालयात 29 जुलै 2021 रोजी सादर केला होता. 30 ऑगस्ट 2021 रोजी व त्यानंतर वेळावेळी सुनावणी घेण्यात आली. सुनावणीवेळी अभय ललवाणी व शिवशंकर भंडारी यांनी कागदपत्रे, तोंडी व लेखी म्हणणे दाखल केले होते.

त्यानंतर उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडील पथकाने १९ एप्रिलला प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच सुनावणीवेळी ललवाणी यांनी दाखल केलेले कागदपत्रे,आणि भंडारी यांच्या घरी व ऑफीस झडतीत मिळालेले कागदपत्रे यावरून मिळकत अवैध सावकारकीतून केल्याचे दिसून येत असल्याने याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात शिवशंकर शांतीलाल भंडारी (रा. दाळमंडई, अहमदनगर) याच्याविरूद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम अन्वये 39 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील शेख अलताफ अब्दुल कादर यांनी फिर्याद दिली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version