अहमदनगर दि.२३ जून
तोतया मालक उभा करून खोट्या कागदपत्रांच्या आधारे खरेदीखताचा बनावट दस्तऐवज करून एका व्यक्तीच्या प्लॉटची परस्पर विक्री झाल्याची घटना नागरदेवळे येथे घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अर्जुन जगन्नाथ बंगाळ (वय ७५, रा. सहकारनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार रिझवान इस्माईल सय्यद, अॅड. तनवीर महेमूद शेख, इम्रान शेख,मुजाहिद सय्यद (सर्व रा. भिंगार) आणि फिर्यादीच्या जागी खरेदीसाठी उभा केलेला तोतया यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर दुसऱ्या एका प्रकरणात अलताफ नबु शेख (वय 40 वर्ष रा. शनि गल्ली झेंडीगेट) यांच्या तक्रारी नुसार मुदसर शेख,कय्युम शेख यांच्यावर अदखलपत्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अलताफ नबु शेख आणि त्यांचे मित्र मनोज प्रभुने यांनी मिळून नगर औरंगबाद रोड वरील पोखर्डी शिवारात 208 गट न मध्ये जमिन खरेदी केलेली आहे. या मोकळ्या प्लॉटवर बुधवारी दि 22 जून रोजी काही मित्रांसोबत प्लॉटची लेव्हल करीत असतांना तेथे मुदसर शेख व कय्युम शेख दोघे आले त्यांनी अलताफ शेख यास दमदाटी करून हा प्लाँट कसाकाय खरेदी केला सदर प्लॉटवर अमचा ताबा आहे. त्यावेळी अलताफ शेख यांनी सांगितले की सदर प्लाँटची खरेदी ही मी घेतलेली आहे याचा राग आल्याने मुदसर शेख व कय्युम शेख या दोघांनी शिवीगाल दमदाटी करुन लाथाबुक्कांनी मारहाण केली तसेच त्या ठिकाणी असलेल्या इम्तीयाज शेख याने भांडणे सोडवण्यासाठी सोडविण्यासाठी आला असता त्यास शिवीगाळ दमदाटी केली व तु जर परत सदर प्लॉटवर आलास तर तुला जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली म्हणुन अलताफ नबु शेख यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.