Home राजकारण नेत्यांच्या कार्यकर्त्यांची घाई, सोशल मीडियावर मंत्रीपदाचे पोस्टर्स

नेत्यांच्या कार्यकर्त्यांची घाई, सोशल मीडियावर मंत्रीपदाचे पोस्टर्स

अमरावती दि.२३ जून

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा वेगळा गट तयार केला. ते 40 आमदारांना घेऊन गुवाहाटीत गेलेत. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलंय. अशावेळी शिवसेना-भाजपची युती होऊ शकते. असं झालं तर रवी राणा यांना कदाचित मंत्रीपदही मिळू शकते. पण, या सर्व शक्यता आहेत. सध्यातरी काही सांगता येत नाही. तरीही राणा यांच्या कार्यकर्त्यांना रवी राणा यांना मंत्री म्हणून पाहायचं आहे. त्यासाठी त्यांनी सोशल मीडियावर मंत्रीपदाचे पोस्टर्स  लावले आहेत.

अद्याप ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद कायम आहे. भाजपची सरकार बसलेली नाही. तरीही काही उत्साही कार्यकर्ते राणा यांना मंत्रीपद मिळाल्यासारखे वागत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version