अहमदनगर दि.७ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील भिंगार कॅम्प पोलिसांनी नगर पुणे रोडवर एका टेम्पो मधून महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करून तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी टेम्पो सह तीन लाख 25 हजारांचा मुद्देमाल या प्रकरणात जप्त केला आहे.
हकीगत अशी की भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांना मिळालेल्या माहितीनुसार नगर पुणे रोडवर एका टेम्पो मधून महाराष्ट्रा मध्ये बंदी असलेल्या सुगंधी सुपारी वाहतूक सुरू असून यामध्ये सुगंधी सुपारी चा मोठा साठा एका टेम्पोमध्ये घेऊन नगर शहरात विक्रीसाठी आणला जात आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी सफौ कैलास सोनार, पोहेकाँ अजय नगरे, पोहेकाँ विलास गारूडकर, पोना राहुल द्वारके, पोना राहुल गोरे, पोना/भानूदास खेडकर यांनी नगर पुणे रोडवर सापळा लावून संशयित जितो कंपनीचा टेम्पो नं एम एच 16 सी डी 2411 याची तपासणी केली असता यामध्ये सुमारे 25,000/- रू किं ची सुगंधी तंबाखू चोरून विक्रीसाठी आणल्याचं समोर आले आहे .
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये मनोहर अर्जुन खेडकर ( वय 42 वर्षे रा. महेश नगर, नगर पाथर्डी रोड, अहमदनगर) सुशील बाळासाहेब केदार ( वय 23 वर्षे रा.ए/13, चाकन ऑईल मिलजवळ, नवनागापुर ता. जि. अहमदनगर )सचिन डोंगरे (पुर्ण नाव माहीत नाही) रा.वडगाव गुप्ता ता.नगर जि. अहमदनगर यांच्या विरूद्ध पोना भानूदास खेडकर यांनी भा द वि कलम 188,272,273 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्हाचा पुढील तपास पोहेकाँ गोपीनाथ गोर्डे हे करत आहेत.