अहिल्यानगर
– राज्यात गुटखा बंदी झाली असतानाही अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक पानटपरीवर गुटखा आणि सुगंधी तंबाखूची खुलेआम विक्री करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी करण्यात येत असून, नगर मधील भिंगार येथील aatiक च्या इशाऱ्यावर गुटखा तस्करीचा हा संपूर्ण खेळ चालवण्यात येत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या संदर्भात संबंधित सर्व विभागांना माहिती असतानाही कारवाई करण्यासाठी कुणीही पुढाकार घेताना दिसून येत नाही.
राज्यात गुटखा बंदी असल्याने शेजारच्या राज्यांमधून मोठ्या प्रमाणात गुटखा अहिल्या नगर येथे बोलावण्यात येतो. बंदी असलेल्या विमल,गोवा, डायरेक्टर अशा कंपनीचे ट्रकची ट्रक सध्या खाली होत आहेत. कंटेनर मधून आलेला गुटखा त्या ठिकाणी आलेला गुटखा साठवून न ठेवता त्याच दिवशी तो छोट्या छोट्या गाडीतून तालुक्याच्या ठिकाणी रवाना करण्यात येतो. जिल्ह्यातील तालुके आणि गावातील छोटा मोठ्या विक्रेत्यांकडे रवाना करण्यात येतो. त्यांच्याकडून हा माल पानटपरी चालकांपर्यंत आणि त्यांच्यामार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येतो. या चेनची माहिती असतानाही त्यावर कारवाई करायचे अधिकार असलेल्या विभागांपैकी एकाही विभागाकडून ठोस कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.
शहरात गुटखा आल्यानंतर या गुटखा पुड्यांची विक्रेते अव्वाच्या सव्वा दराने विक्री करून ग्राहकांची लूट करत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने ठोस कारवाई करून गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे.
जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या या गुटख्याच्या तस्करीमधून दररोज साधारणत: दहा ते वीस लाख रुपयांची उलाढाल होते. अशाच प्रकारे अन्य ठिकाणी हा माल पुरवण्यात येतो. त्यामुळे महिन्याकाठी कोट्यवधी रुपयांच्या गुटख्याची तस्करी अहिल्या नगर जिल्ह्यात होते. त्या मानाने होणारी कारवाई अत्यल्प प्रमाणात आहे.
सध्या या धंद्याचा आका हा atiक असून त्याच्या इशाऱ्यावरच संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात माल सप्लाय केला जातो. हा आता जिल्ह्याचा गुटखा तस्करीचा बोका झाला असून. हा बोका सध्या गुटखा तस्करीतून मलई खाण्याचे काम करत आहे.