अहमदनगर दि.२१मे
राज्यातील राजकीय नेते कामगारांच्या हिताच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सत्ता मिळवण्यासाठी धडपडत आहेत सत्ता मिळवण्यासाठी कोणताही थराला सत्ताधारी जात असून ही लोकशाहीची थट्टा चालू असल्याची टीका कामगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबा आढाव यांनी नगर येथे बोलताना केली ते माथाडी कामगारांच्या 21व्या वार्षिक अधिवेशनासाठी नगर येथे आले होते.
लोकशाही मनापासून का स्वीकारत नाही तुम्ही आश्वासन देता रोज नवीन नवीन सांगता मात्र पंतप्रधान लोकशाही स्वीकारत नाही असं मला वाटतं असाही त्यांनी सांगितले तर आरएसएस चे प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका करताना डॉक्टर बाबा आढाव म्हणाले की ब्राह्मणांनी प्रायश्चित्त घेतलं पाहिजे असे मोहन भागवत म्हणतात मात्र प्रायश्चित्त कशासाठी घेतले पाहिजे याचा उत्तर ते देत नाहीt त्यांना याचे उत्तर विचारलं पाहिजे असंही बाबा आढाव यांनी यावेळी वक्तव्य केलेय.