अहमदनगर दि.22 मे
अहमदनगर शहरातील तारकपुर बस स्थानकात समोर तोफखाना पोलिसांच्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला पकडले असून त्याच्या कडून गावठी बनावटीचा कट्टा आणि तीन जिवंत काडतुस हस्तगत करण्यात आले आहे.अरबाज रज्जाक बागवान असे या गुन्हेगारचे नाव आहे.
अरबाज रज्जाक बागवान याच्यावर जातीय दंगल, खुनाचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल असुन या गुन्ह्यात तो फरार होता.
तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साळवे ,सहायक पोलीस निरीक्षक- जुबेर मुजावर,नितीन रणदिवे, पो.उप.निरीक्षक समाधान सोळंके, पो.हे.कॉ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाट, पो.ना.अविनाश वाकचौरे, धिरज खंडागळे, संदिप धामणे, वसिम पठाण, अहमद इनामदार, सचिन जगताप, सुरज वाबळे, सतिष त्रिभुवन, सतिष भवर, संदिप गिऱ्हे, गौतम सातपुते, दत्तात्रय कोतकर, शिरीष तरटे तसेच तांत्रिक विभाग अहमदनगर दक्षिण पो.कॉ.नितीन शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी केलीय