अहमदनगर दि.१६ ऑगस्ट
अहमदनगर मध्ये 15 ऑगस्ट च्या दिवशीच एक धक्कादायक घटना घडली असून ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला आहे त्याच दिवशी भारता बद्दल आक्षेपार्ह करण्याची भाषा काही तरुणांनी केली आहे. विशेष म्हणजे लष्करी जवानांच्या समोरच अशा घोषणा दिल्यामुळे त्या ठिकाणी तैनात असलेल्या लष्करी जवानांनी या तरुणांना ताब्यात घेऊन भिंगार काम पोलिसांच्या हवाली केले होते.
याप्रकरणी लष्करी जवानांकडून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आले असून या तक्रारीमध्ये भारत देशाबद्दल आक्षेपार्य विधान करून भारताचे तुकडे होतील अशा घोषणा देण्यात आल्या होत्या या तक्रारीवरून सार्वजनिक एकोप्याला बाधा होईल भा द वी.153 (अ )134 प्रमाणे पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे त्यामधील तीन जण अल्पवयीन असल्यामुळे त्यांना नोटीस देऊन पालकांच्या हवाली करण्यात आले आहे तर दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शहरात धार्मिक तेढ उत्पन्न होईल असे आक्षेपार्ह पोस्टर आणि व्हिडिओ या आधीच व्हायरल झाले आहेत .या प्रकरणी अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून आता भारताचे तुकडे करण्याचे भाषा तरुणांच्या तोंडून होत असल्यामुळे एक चिंताजनक बाब आहे.