अहिल्यानगर
दि. १९ जानेवारी २०२६ रोजी पिकअप वाहनाने धडक देऊन संदीप लगड यांचा खून केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपी राजेंद्र रमेश घोंगडे यास जिल्हा व सत्र न्यायालय, अहिल्यानगर यांनी जामीन मंजूर केला आहे.
आरोपीतर्फे अॅड. अक्षय शिंदे ,अॅड. संकेत गर्जे यांनी न्यायालय मध्ये जामीन अर्ज दाखल केला होता .
युक्तिवाद करताना अॅड. अक्षय शिंदे यांनी नमूद केले की, सदर प्रकरण पूर्णतः परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असून प्रकरणात कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार उपलब्ध नाही. संशय कितीही गंभीर किंवा प्रबळ असला, तरी तो पुराव्याची जागा घेऊ शकत नाही. तसेच,कथित वाहन आणि मृत्यू यांच्यातील संबंध सिद्ध करणारा कोणताही वैज्ञानिक अथवा ठोस पुरावा तपास यंत्रणेकडे उपलब्ध नाही. आरोपीच्या पुढील कोठडीची आवश्यकता राहिलेली नाही, असा मुद्दाही न्यायालयासमोर मांडण्यात आला.
सरकारी पक्षाने व मूळ फिर्यादी यांनी जामीन अर्जास विरोध केला. तथापि, जिल्हा व सत्र न्यायालय अहिल्यानगर यांनी या प्रकरणातील पुरावे व सर्व बाबी लक्षात घेऊन आरोपी राजेंद्र रमेश घोंगडे यास रु. १,००,०००/- (एक लाख) च्या वैयक्तिक जातमुचलक्यावर व त्याच रकमेच्या एक जामीनदारावर नियमित जामीन मंजूर केला.



