अहिल्यानगर
अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका महिलेने इंस्टाग्राम अकाउंट वरून अहिल्यानगर शहरासह हिंदू धर्मातील देव देवतांसह कौरव पांडव आणि अहिल्याबाई होळकर यांच्या नावाबाबत अत्यंत खालच्या दर्जाचे वक्तव्य करून इंस्टाग्राम अकाउंट वर अपलोड केले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी स्वतः फिरती होत कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये केडगाव येथील आफ्रोज हमीद शेख या महिलेविरुद्ध दोन समजत तेढ निर्माण करणे तसेच हिंदू देवतांबद्दल अत्यंत अश्लील भाषेत वक्तव्य करणे. अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेबाबत हकीकत अशी की कोतवाली पोलीस स्टेशन मधील गोपनीय शाखेत कार्यरत असलेले अनुप झाडबुके हे instagram अकाउंट चेक करत असताना त्यांना अफरोज शेख या इंस्टाग्राम आयडीवर एक व्हिडिओ दिसला त्यामध्ये हिंदू देवतांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करण्यात येत होते. तसेच अहिल्यानगर शहराचे नाव बदलले त्याबद्दलही अत्यंत घाणेरड्या शब्दात वक्तव्य करण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अहिल्याबाई होळकर ,महाभारत आणि त्यामधील पांडव यांच्या बाबतही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य करून त्या महिलेने मेरे उपर केस फाईल करने की, तो याद रख मै ना तो किसी केस से डरती हु, ना किसी और चिज से डरती” असे ठणकावून सांगत बघणाऱ्यांना थेट धमकीच दिली होती.
हा सर्व व्हिडिओ पाहून पोलीस कर्मचारी अनुप झाडबुके यांनी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून याप्रकरणी आता केडगाव येथील अफरोज हमीद शेख या महिलेला कोतवाली पोलिसांनी अटक केली असून तिला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने तिला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.





