अहमदनगर दि.२९ एप्रिल
अहमदनगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौक परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्ण कृती पुतळा बसावावा अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून अखेर पुतळा बसवण्यासाठी सर्व प्रशासकीय मंजुरी मिळाली असताना महापालिका प्रशासनाच्या वतीने दिरंगाई होत असल्याने धर्मवीर संभाजी महाराज स्मारक कृती समितीच्या वतीने महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांना निवेदन देण्यात आले. या स्मारकाचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्या मागणीलाही मनपा प्रशासनाने केराची टोपली दाखवल्याने अखेर शनिवारपासून धर्मवीर संभाजी महाराज स्मारक कृती समितीच्या वतीने प्रोफेसर कॉलनी चौकात आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते.
महापालिकेच्या वतीने चौकातील मालकाची जागा अधोरेखित करण्यात आली असून त्या जागेवर कंपाउंड उभारण्यात आले आहे. या स्मारकाचे भूमिपूजन येत्या 14 मे रोजी करण्यात येईल तसेच सर्व प्रशासकीय मंजुरी झाली असेल या कामास लवकरच सुरुवात करण्यात येईल अशी आश्वासन महानगरपालिकेचे उपमहापौर गणेश भोसले उपायुक्त यशवंत डांगे यांनी दिल्यानंतर त्यांच्या हस्ते उपोषणास बसलेल्या कार्यकर्त्यांना सरबत पाजून उपोषण सोडण्यात आले उपोषणास अजिंक्य बोरकर संतोष लांडे वैभव वाघ,मळू गाडळकर, विजय सुंबे,सतीश बारस्कार,वैभव ढाकणे अंकुश चत्तर गणेश बोरुडे चेतन अग्रवाल जितेंद्र बनकर सत्यजित धवन किरण बारस्कर चेतन अग्रवाल मोहन गुंजाळ राम वाघ पप्पू पठारे अनिकेत चव्हाण गेल्या दोन दिवसांपासून बसले होते.