.अहमदनगर दिनांक 14 ऑक्टोबर
अहमदनगर शहरातील बुरुडगाव रोड परिसरातील वडिलोपार्जित जमीन एका भावाने परस्पर विकली असल्याची तक्रार दुसऱ्या भावाने दिली आहे. या प्रकरणात वडिलोपार्जित जमिनी मध्ये वडिलांनंतर सहा भाऊ व एक बहीण वारसदार असताना यातील विक्री करणाऱ्या आरोपीने आपण एकमेव अर्जदार असल्याचे आईच्या सहीचे लेखी पत्र नगर भूमापन अधिकारी कार्यालयाला देऊन तशी नोंद करून घेतली होती व नंतर जमीन विक्री केली होती.
याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असून प्रभाकर गंगाधर भिंगारदिवे (वय-६६ वर्षे धंदा-सेवानिवृत्त प्लॉट नं २१०२शिवनेरी बिल्डींग मॉडर्न कॉलेजजवळ, शिवाजीनगर पोलीस वसाहत पुणे ४११००५ मुळ रा माळीवाडा जिल्हा परिषदसमोर, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली असून प्रभाकर भिंगारदिवे यांची वडिलोपार्जित जमीन टि पी स्कॉप नं.३ जुना सिटीएस नं६५८२ येथील प्लॉट नं २०० मधील ४६.४ चौ मो क्षेत्राचा माळीवाडा येथे असताना त्यांचा भाऊ पदमाकर गंगाधर भिंगारदिवे (रा विनायकनगर फुलसौंदरमळा
| बुरुडगांवरोड अहमदनगर ) याने अहमदनगर येथील नगर भूमापन अधिकारी कार्यालयात या जमिनी बाबत वडिलांनंतर आपण एकटेच वारस आहोत अशा आशयाचे आणि आईच्या सहीचे पत्र कार्यालयात दिले होते व वडिलांनंतर आपण एकटेच वारसदार असे सांगत जमिनीची विक्री केली होती.
वास्तविक पाहता या जमिनीमध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर सहा सहा भाऊ आणि एक बहीण असे वारसदार असताना खोटी कागदपत्रे रंगवून इतर भावांची व बहिणीची फसवणूक केली असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या नुसार भादंवि कलम ४२०,४६७,४७१ प्रमाणे पदमाकर भिंगारदिवे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्याचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखालीपोसई मनोज कचरे करीत आहेत.