अहमदनगर दि.१० जानेवारी
मकरसंक्रातीचा सण जवळ आल्याने पतंग व मांज्याच्या विक्रीने जोर पकडला आहे. आम्ही आपल्या निदर्शनास आणु इच्छीतो कि, नायलॉन चायना मांजावर बन्दी असतान्नाही त्याची सर्रास विक्री केली जाते. सदर मांजा ऑनलाईन इ – कॉमर्स प्लॅटफॉर्मवर ही उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिकान्ना अनेक अपघातान्ना सामोरे जावे लागत आहे. रोज किमान 4-5 घटना घडत आहेत. त्याचे प्रमाण येत्या काही दिवसात त्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. चायना मांजा पायात व पंखात अडकून अनेक पक्षीही प्राणान्ना मुकत आहेत.
त्यामुळे सर्वसामान्य नागरीक, वाहन चालक व पक्ष्यांच्या जिवाशी खेळणारा चायना मांजा विक्रीचा धंदा कठोर कायदेशीर कारवाई करुन बन्द केला पाहिजे. अशा आशयाचे निवेदन जाणीव फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यान्ना देण्यात आले. त्यांच्या वतीने मधुकर साळवे साहेब, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा यांनी निवेदन स्वीकारले.
त्यांनी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. यावेळी चिनी मांज्यामुळे मान कापलेले भूपेंद्र रासने यांच्यासह जाणीव फाऊंडेशनच्या वतीने सुवर्णकार महेंद्र नांदुरकर, बांधकाम व्यावसायिक प्रदीप वाखुरे, ॲड. विक्रम वाडेकर, छायाचित्रकार राहुल जोशी, इंजि. कैलाश दिघे, विकास गायकवाड व सतीश शिंदे उपस्थित होते.