अहमदनगर दि.१० जानेवारी-
भिंगार छावणी परिषदची भरती प्रक्रिया काही दिवसच बाकी असतांना छावणी परिषदचे काही अधिकारी व त्याचे सहकारी गांवात उमेदवार पाहण्यास सुरुवात केलेली आहेत. काही उमेदवाराची तर डिल पण फिक्स करण्यात आलेली आहेत. छावणी परिषद मार्फत अनेक पदासाठी भरती होणार आहे. वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे भाव ठरविण्यात आलेले आहेत. (१) लिपीक पदासाठी २० लाख रुपये (२) नर्स पदासाठी १२ लाख रुपये (३) शिक्षक पदासाठी १५ लाख रुपये (४) शिपाई पदासाठी १० लाख रुपये (५) मजदूर पदासाठी ८ लाख रुपये (६) सफाईवाल्या पदासाठी ७ लाख रुपये (७) माळी पदासाठी ७ लाख रुपये अश्या प्रकारे विविध पदासाठी अश्या प्रकारे पैशाची मागणी छावणी परिषदचे काही अधिकारी आणि त्याचे सहकार्यामार्फत करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील सुशिक्षित बेरोजगार मुले या भरती प्रक्रियेतून वंचित वंचित राहण्याची शक्यता आहे.अहमदनगर छावणी परिषदची भरती नेहमी वादग्रस्त झालेली आहेत (अकौन्टन्ट पदावर) बसलेला वरिष्ठ अधिकारी संपुर्ण भरती प्रक्रिया राबविण्याचे काम करत आलेला आहे. तरी भिंगार छावणी परिषदची भरती प्रक्रिया पारदर्शकपणे घ्यावी अशी मागणी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे विश्व मानव अधिकार परिषदेच्या वतीने शेख अल्ताफ युसुफ यांनी निवेदनाद्वारे केली.
तसेच या निवेदनाची प्रत डी.जी. दिल्ली, पी.डी. पुणे, पी.एम. कार्यालय भारत सरकार, सी.बी.आय. पुणे यांनाही पाठविण्यात आले आहे.