अहमदनगर दि.4 जुलै
अहमदनगर महानगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली असून पुढील सुनावणी ही सोमवार आठ जुलै रोजी होणार आहे.
अहमदनगर महानगरपालिकेचे डॉक्टर पंकज जावळे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मागील आठवड्यामध्ये साडेआठ लाख रुपयांची लाच प्रकरणी गुन्हा दाखल केला होता . डॉक्टर पंकज जावळे यांचे स्वीय सहाय्यक शेखर देशपांडे यांनी एका बिल्डर कडून लाच मागितली होती त्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे