Homeविशेषव्यापाऱ्यांच्या मागे उभे राहून सर्वपक्षीय राजकारण होते का ? व्यापाऱ्यांना आपला प्रश्न...

व्यापाऱ्यांच्या मागे उभे राहून सर्वपक्षीय राजकारण होते का ? व्यापाऱ्यांना आपला प्रश्न कायमचा सोडवायचा असेल तर राजकारण विरहित आंदोलन उभं करावे लागेल तरच प्रश्न कायमचा मिटू शकतो !

advertisement

अहमदनगर दि.१६ एप्रिल
अहमदनगर शहरात गेल्या काही महिन्यांपासून कापड बाजार हा एक चर्चेचा विषय झाला आहे. कापड बाजार बंद व्हायचा तो काही कारणांमुळे मात्र आता गेल्या काही महिन्यांपासून कापड बाजार अतिक्रमनाच्या मुद्द्यांवर पाच ते सहा वेळा बंद करण्यात आला आहे. कापड बाजारातील व्यावसायिक आणि रोडवर लागणाऱ्या हातगाड्या यांच्या संघर्षामुळे कापड बाजार बंद होण्याची ही पाचवी ते सहावी वेळ आहे. विशेष म्हणजे जेव्हा जेव्हा कापड बाजार मध्ये व्यापाऱ्यांचे आंदोलन झाले त्या त्यावेळी या आंदोलनाला शहरातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला. व्यापारांच्या आंदोलनात सहभागी झाले उपोषणात सहभागी झाले त्या ठिकाणी कापड बाजारातील मुख्य चौकामध्ये बसून सर्वपक्षीय नेत्यांनी अतिक्रमणे कायमची काढायला हवी यासाठी मोठमोठी भाषणही ठोकली होती. मात्र तो दिवस संपला की कापड बाजाराचा विषय संपला असंच काहीसा प्रकार याआधीही घडला होता.कापड बाजारात मधील व्यापारी आणि हातगाडी व्यवसाय करणारी छोटे व्यवसायिक यांच्यातील संघर्ष सुरूच होता. मात्र यावर सर्वच पक्षांनी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला सर्वपक्षीय नेत्यांनी व्यापाऱ्यांना पाठिंबा देत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत असं भासवलं गेलं मात्र ज्या महानगरपालिकेने कारवाई करायला हवी होती त्या महानगरपालिकेत सर्वच पक्षांची सत्ता असताना व्यापाऱ्यांना आजपर्यंत न्याय का भेटला नाही राज्यात काल-परवापर्यंत महाविकास आघाडीची सत्ता होती आज भाजप सेनेची सत्ता आहे हे सर्वच राजकीय पक्षांचे नेते अहमदनगर शहरात आहेत मात्र तरीही व्यापाऱ्यांना न्याय का भेटत नाही? व्यापाऱ्यांच्या या प्रश्नाचे भांडवल करून गरम तव्यावर सर्वपक्षीय नेते आपली राजकीय पोळी भाजून तर घेत नाही ना! असा प्रश्न आता उपस्थित राहतोय.

शुक्रवारी एका व्यापाऱ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा कापड बाजार बंद केला गेला पुन्हा एकदा कापड बाजारातील त्याच चौकामध्ये व्यापाऱ्यांनी आणि अहमदनगर शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी उपस्थिती लावून अतिक्रमणाबाबत पुन्हा एकदा मोठमोठी भाषण ठोकली या भाषणांमध्ये आणि त्यानंतर झालेल्या चर्चेमध्ये प्रत्येक राजकीय पक्ष इतर राजकीय पक्षांकडे बोटे दाखवून अतिक्रमण करणारे त्यांचे समर्थक आहेत असे सांगून अंग झटकत होता. या आंदोलनात मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होऊन इतरांवर चिखल फेक होताना वारंवार दिसून येत आहे. व्यापाऱ्यांच्या आंदोलनातून इतर लोकांवर चिखल फेक कशी होईल हाच हेतू काही राजकीय नेते घेऊन या आंदोलनात उतरताना दिसत आहे.

कापड बाजारातील व्यावसायिक आणि रस्त्यावर लागणारे हातगाडीधारक हे अनेक वर्षांपासून या ठिकाणी गुण्या गोविंदाने आपला व्यवसाय करत होते मात्र काही वर्षांपासून याला ग्रहण लागले आहे.आणि वाद-विवाद सुरू झाले आहेत मात्र काही ठराविक लोकच यामागे असल्याचं वारंवार समोर येत आहे. काही ठराविक लोकच व्यापाऱ्यांना त्रास देतात त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या इतर व्यवसायिकांना याचा फटका बसतोय. ज्यांना राजकारण करायचंय त्यांचा राजकारण होतं मात्र मोठ्या व्यवसायिकांसह छोटे व्यावसायिक यामध्ये होरपाळून निघत आहेत याकडे मात्र कोणाचे लक्ष नाही.

अतिक्रमण म्हणजे की महानगरपालिकेकडे बोट दाखवले जाते जेव्हा अतिक्रमण काढायचे असेल तर महानगरपालिका पोलीस बंदोबस्त नसल्याने पोलीस प्रशासनाकडे बोट दाखवते मात्र यामध्ये सर्वात मोठी चुकी आहे ती महानगरपालिकेची कारण जेव्हा अतिक्रमण होत असते तेव्हा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाला हे समजत नाही का किंवा दिसत नाही का? तर हे साफ खोटे आहे महानगरपालिकेच्या प्रशासनाला हे सर्व माहीत असतं मात्र यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग काहीच करत नाही. आणि जेव्हा असा मोठा प्रसंग घडतो तेव्हा हेच राजकीय नेते अतिक्रमण विभागाला टार्गेट करत असतात त्यामुळे अतिक्रमण विभागाने राजकीय दबाव जुगारून काम केले तर एकही अतिक्रमण कापड बाजार मध्ये लागू शकणार नाही हेही तेवढेच सत्य आहे.मात्र प्रत्येक ठिकाणी राजकीय हस्तक्षेप होत असल्याने अहमदनगर शहराचा विकास खुंटला आहे. प्रत्येक प्रश्नात राजकारण घुसत असल्याने प्रश्न कधीच सुटणार नाही त्यामुळे आता नागरिकांनाच सावध आणि सजग व्हायला हवंय आपला विकास आपल्याच हाती आहे. त्यामुळे राजकारण गेलं चुलीत असं म्हणून नागरिकांनी रस्त्यावर उतरायला हवं तरच अहमदनगर शहर सुधारु शकेल आणि कापड बाजाराचा कायमचा प्रश्न सोडवायचा असेल तर व्यापाऱ्यांनी राजकीय हस्तक्षेप विरहित आंदोलन केलं तरच ते आंदोलन यशस्वी होऊ शकतं हे तेवढेच खरं आहे.नाहीतर पहिले पाढे पंचावन्न हे होणारच आहे.व्यापाऱ्यांचा फक्त उपयोग होतोय व्यापाऱ्यांना याचा काही फायदा होणार नाही आणि उपयोग झाल्यानंतर व्यापाऱ्यांना पुन्हा सोडून दिले जाईल त्यामुळे व्यापाऱ्यांनी आता सावध होणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular