Homeदेश"कर्नाटक नव्याने पाहूया" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमना वेळीच विमानतळा बाहेर लागले...

“कर्नाटक नव्याने पाहूया” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमना वेळीच विमानतळा बाहेर लागले मोठमोठे फ्लेक्स

advertisement

नागपूर दि.४ नोव्हेंबर : कर्नाटक सरकारच्या (Karnataka Government) अतितायीपणामुळे सीमावर्ती भागात हायहोल्टज् ड्रामा सुरु आहे. दररोज नवनवीन घोषणा, कुरापती काढत कर्नाटकने महाराष्ट्र सरकारच्या डोक्याला भलताच ताप दिला आहे. आता तर थेट त्यांनी नागपूर विमानतळा बाहेर बोर्ड लावून “कर्नाटक नव्याने पाहूया” या अशा आशयाचे बोर्ड लावून थेट महाराष्ट्रातच घुसखोरी केली आहे. विशेष म्हणजे आज समृद्धी महामार्गाची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर विमानतळावर येणार आहेत. त्यांच्या या आगमनाच्या दिवशीच कर्नाटक सरकारने विमानतळा बाहेर फ्लेक्स लावून थेट महाराष्ट्रात घुसखोरी केल्याचं समोर येत आहे. आता याबाबत महाराष्ट्र सरकार काय भूमिका घेणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

कर्नाटक सरकारने विकासाच्या घोषणांचा पाऊसच पाडला नाहीतर, पाणी सोडण्याच्या कृतीतून सीमावर्ती भागातील (Border Village) गावकऱ्यांना बंडासाठीही भरीस पाडले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक राजकीय प्रश्न बाजूला फेकल्या गेले असून सीमावर्ती भागातील कानडी राग थोपविण्याची मोठी जबाबदारी राज्य सरकारवर येऊन पडली आहे. कर्नाटक सरकारने आळवलेल्या या कानडी रागाचे सूर नेमके काय आहे, का कर्नाटक सरकार असा डावपेच खेळत आहे?

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सीमावर्ती भागावर कर्नाटक सरकारने दावा ठोकला आहे. जत तालुक्यातील 40 गावांवर त्यांनी अगोदर हक्क सांगितला. त्यानंतर अक्कलकोटसह सोलापूर जिल्ह्यावरच दावा ठोकला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याविषयीचे विधान केले होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular