अहिल्यानगर दिनांक १९ सप्टेंबर
सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी अज्ञात इसमावर भिंगार पोलीस स्टेशन मध्ये मतीन ख्वाजा सय्यद यांच्या फिर्यादीवरून धार्मिक भावना दुखवणे तसेच अफवा पसरणे खोटी विधाने पसरवणे बी एन एस कलम 299 (353) (2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम वरून मुस्लिम समाजातील महिलांविषयी धार्मिक भावना दुखवतील अशी पोस्ट करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिंगार कॅम्प पोलीस अज्ञात व्यक्तीचे व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम तपासून त्या व्यक्तीला शोधण्याचे काम करीत आहेत.
कोणत्याही धर्माविषयी अथवा समाजाविषयी धार्मिक तेढ निर्माण होईल असे वक्तव्य सोशल मीडियावर करू नये अथवा कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आवाहन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी केले आहे.