Homeक्राईमकेडगाव शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामधील आरोपींकडून पुन्हा एकदा त्या शिवसैनिकांच्या घरासमोर जाऊन फटाक्यांची...

केडगाव शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामधील आरोपींकडून पुन्हा एकदा त्या शिवसैनिकांच्या घरासमोर जाऊन फटाक्यांची अतिषबाजी करत दंड थोपटून दिले कुटुंबीयांना आव्हान…

advertisement

अहिल्या नगर दि.25 ऑक्टोबर

केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामधील आरोपींकडून पुन्हा एकदा खून केलेल्या शिवसैनिकांच्या घरापुढे जाऊन दहशत करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार समोर आला आहे. लॉटरी विक्रेता अशोक लांडे खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा लागलेली आणि सध्या जामीन घेऊन जेल बाहेर असलेले तसेच केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडात आरोपी असलेल्या माजी महापौर संदीप कोतकर आणि त्यांच्या समर्थकांनी हा प्रकार केला आहे.

माजी महापौर संदीप कोतकर याच्यावर अहमदनगर मधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून यानंतर त्यास जिल्हा बंदीची आठ करण्यात आली आहे निवडणुकीचे कारण सांगून ही जिल्हा बंदी उठवण्यासाठी अहमदनगर न्यायालयात माजी महापौर संदीप कोतकर आज आला होता. मात्र कोर्टात हजर राहण्यासाठी आलेल्या माजी महापौर संदीप कोतकर यांची त्यांच्या समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली तसेच ही मिरवणूक च्या शिवसैनिकांचे खून झाले त्या शिवसैनिक यांच्या घरासमोरून घेण्यात आली तसेच त्या शिवसैनिकांच्या घरासमोर फटाकडे फोडून दंड थोपवून पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबीयांना धमकवण्याचा प्रकार समोर आला असून याप्रकरणी आता कोतवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची हकीगत अशी की 2018 साली प्रभाग क्रमांक 16 मध्ये महानगरपालिकेची पोट निवडणूक झाली होती या पोटनिवडणूक नंतर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले होते आणि याच दरम्यान संजय केशव कोतकर आणि वसंत आंनदा ठुबे या दोन शिवसैनिकांची राजकीय वैमान्यातून अत्यंत निर्घृणपणे गळा चीरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी संदीप कोतकर हा मुख्य आरोपी म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची सुनावणी सध्या जिल्हा न्यायालयात सुरु असून त्यापूर्वी अशोक लांडे खून प्रकरणात माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह त्याचे बंधू सचिन कोतकर भानुदास कोतकर यांना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली होती या शिक्षेला स्थगिती घेऊन सध्या सर्वजण जमिनीवर बाहेर आहेत मात्र न्यायालयाने त्यांना जिल्हा बंदीचे आदेश दिले होते.

विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने आणि कुटुंबातील एक सदस्य विधानसभेला उभारणार असल्याचे कारण देत संदीप कोतकर यांनी आपल्यावर लागू असलेली जिल्हा बंदी उठवावी या यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता या अर्जावर आज सुनावणी होती मात्र जिल्हा बंदी उठवण्या आधीच संदीप कोतकर यांच्या कार्यकर्त्यांनी संदीप कोतकर यांचे जल्लोषात स्वागत केले मात्र हे स्वागत करत असताना संदीप कोतकर आणि त्यांच्या समर्थकांनी पुन्हा एकदा ज्या शिवसैनिकांचा खून केला होता त्यांच्या घरासमोर जाऊन फटाक्यांची आतिषबाजी करत दंड थोपटून पुन्हा एकदा त्या शिवसैनिकांच्या कुटुंबांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला या प्रकरणामुळे कै .संजय कोतकर यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुनिता कोतकर ह्या चांगल्याच भयभीत झाल्या आणि त्यांनी मुलगा संग्राम कोतकर यास फोन करून घटनेची हकीगत सांगितली त्यानंतर संग्राम कोतकर यांनी तातडीने घरी धाव घेतली त्यावेळी संदीप कोतकर यांच्यासह त्याच्याबरोबर असलेले कार्यकर्ते तिथून निघून गेले होते मात्र त्या ठिकाणी असलेल्या काही लोकांनी या घटनेचा व्हिडिओ काढून ठेवल्यामुळे संपूर्ण घटना समोर आली ज्या शिवसैनिकांचा खून केला त्याच शिवसैनिकांच्या घरासमोर जाऊन आनंद उत्सव साजरा करून पुन्हा एकदा गुंडागिरी कशी असते हे दाखवून देण्याचा प्रयत्न आरोपींकडून करण्यात आल्याचा आरोप संग्राम कोतकर यांनी केला आहे. याबाबत संग्राम कोतकर यांनी तातडीने अहमदनगर मधील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत संदिप भानुदास कोतकर 2) सचिन भानुदास कोतकर 3) विनोद लगड 4) निलेश (बाप्पु) सातपुते 5) भुषण अशोक गुंड 5) रमेश तात्याभाऊ कोतकर 6) विजय कोतकर 7) अशोक रावसाहेब कोतकर 8) संताष बारस्कर 9) सोमनाथ बन्सी कराळे 10 ) अशोक मोहन कराळे 11) ऋषीकेश हरि सातपुते 12 ) गणेश पांडुरंग सातपुते 13)गणेश अंजाबापु सातपुते 14 ) सागर अंजाबापु सातपुते 15) भुषण (सोनु) सुपेकर 16) अभिषेक रावसाहेब ठुबे 17) सेंकेत हरी सातपुते 18) महेश कांबळे 19) राहुल दादु कांबळे 20) किशोर जेजुरकर 21) नुर मोहमद पठाण 22) बाबसाहेब (टगोर बाबा) कोतकर 23) सिराज शेख 24 ) अनिल बापुसाहेब ठुबे 25 ) अदित्य (मुन्ना) शिंदे 26) विजय एकनाथ कराळे 27) सौरभ जपकर 28) संदिप (जॉ ंन्टी) बाळासाहेब गि-हे 29 ) भानुदास महादेव कोतकर 30) रविंद्र रमेश खोलम (फोटो ग्राफर) 31) गणेश (केबल वाला) साळुंके 32) सचिन अंजाबापु सतपुते 33) ज्ञानेश्वर (माऊली) कोतकर 34) प्रशांत कार्ले (टेलर) 35 ) स्वप्नील सुनिल सातपुते 36 ) आमोल सुनिल सातपुते 37 ) राजेश वैजनाथ सातपुते 38) मच्छिंद्र दगडु हुलगे 39 ) मनोज पवार 40 ) नवनाथ विश्व घेबुड 41) गणेश शंकर नन्नवरे 42 ) माहावीर रमेश मोकळे 43) विशाल बाळासाहेब कोतकर सर्व रा. केडगाव, अशा जवळपास 200 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विशेष म्हणजे दोन शिवसैनिकांच्या हत्येमध्ये संदिप भानुदास कोतकर हा मुख्य आरोपी असताना आणि आज जिल्हा बंदीची आठ शिथिल करण्यासाठी न्यायालयात हजर राहण्यासाठी आला असतानाही त्याने आपली ताकद दाखवण्यासाठी समर्थकांसह मिरवणूक काढून आतिषबाजी करत पुन्हा त्याच हत्या केलेल्या शिवसैनिकांच्या घरासमोर जाऊन दंड थोपटणे म्हणजे हत्या झालेल्या कुटुंबीयांना धमकावन्याचा प्रकार समोर आला आहे.

संग्राम संजय कोतकर यांच्या फिर्यादी नुसार कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये वरील आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 कलम 189(2),190,223 3(5),351(2),352 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular