अहिल्यानगर दिनांक 25 ऑक्टोबर
अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी आणि केडगाव
शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामध्ये आरोपी असलेला संदीप कोतकर यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला असून आचारसंहितेचा भंग प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विधानसभेची आचारसंहिता सध्या लागू असून त्या अनुषंगाने प्रशासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे अथवा वाद्य वाजवणे याबाबत बंदी घालण्यात आलेली आहे परवानगी काढून प्रचार अथवा वाद्य वाजवण्याची मुभा देण्यात आली आहे मात्र केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणात आरोपी असलेला संदीप कोतकर यांच्यावर जिल्हा न्यायालयाने जिल्हा बंदीचे आदेश दिले होते ही जिल्हा बंदी उठण्यात यावी यासाठी संदीप कोतकर हा न्यायालयात हजर होण्यासाठी नगरमध्ये आल्यानंतर त्याच्या समर्थकांनी त्याची जंगी मिरवणूक काढली होती तर ठिकठिकाणी घोषणा देण्यात आल्या होत्या.
केडगाव उपनगरात संदिप भानुदास कोतकर याने त्याच्या समर्थकांसह केडगाव देवी ते एकनाथ नगर अशी पायी रॅली काढली तसेच या रॅलीमध्ये मोठ मोठ्या घोषणाही देण्यात आल्या होत्या तसेच लाऊड स्पीकर चा वापर करून सभाही घेण्यात आली त्यामुळे आचारसंहितेच्या भंग झाल्याप्रकरणी संदीप कोतकर याच्यासह सुनिल सर्जेराव कोतकर रा केडगावअहिल्यानगर 3. संतोष सुखदेव बारस्कर रा केडगाव 4. गणेश आंनदकर रा कायनेटीक चौक अहिल्यानगर 5.जालिंदर कोतकर यांच्यावर
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग करुन विनापरवाना रॅली काढुन, एकनाथ नगर केडगाव येथे सभा घेवुन त्यामध्ये विनापरवना ध्वनीक्षेपकाचा वापर केला म्हणुन भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223 अन्वये कोतोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जिल्हा बंदी उठवण्याचा संदीप कोतकर याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.
नगर जिल्ह्यातील राजकीय कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांची दिनांक 7/ 4/2018 रोजी निवडणुकीच्या वादातून हत्या करण्यात आला होता. या दुहेरी खुनामुळे नगर जिल्ह्यामध्ये खळबळ माजली होती. सदरच्या प्रकरणांमध्ये नगर जिल्ह्यातील प्रभावी राजकीय कुटुंबातील संदीप कोतकर याचाही समावेश होता.
दरम्यान आरोपी संदीप कोतकर याने या दुहेरी खून खटल्यात जिल्हा न्यायालय मध्ये जामिनासाठी अर्ज केला होता.जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर करताना त्याला नगर जिल्ह्यामध्ये बंदी करण्यासंबंधी अट घातली होती. सदर अटीतून सवलत मिळण्यासंबंधी आरोपी संदीप कोतकर यांनी जिल्हा न्यायालयामध्ये अर्ज केला होता. सदरच्या अर्जाच्या अनुषंगाने मूळ फिर्यादी यांच्या वतीने सदर प्रकरणात जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. त्या अनुषंगाने न्यायालयाने आज कोतकर याचा अर्ज निकालासाठी ठेवला होता.
दरम्यान,न्यायालयाने दिलेल्या सवलतीचा दरुपयोग करून संदीप कोतकर याने काल नगर जिल्ह्यामध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करून विनापरवानगी जंगी मिरवणूक काढली होती.ही मिरवणूक केडगाव मधून जात असताना संदीप कोतकर व त्याचे सहकारी यांनी फिर्यादी संग्राम कोतकर यांच्या आईला धमकावल्यासंबंधी संग्राम कोतकर यांनी काल कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.त्याचप्रमाणे मिरवणुकीच्या दरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यासंबंधी कोतवाली पोलीस स्टेशन यांनी वेगळी फिर्याद दाखल केली आहे.या दोन्ही फिर्यादीच्या अनुषंगाने संग्राम कोतकर याच्या राजकीय अडचणीमद्धे वाढ होणार आहे.
सदर दोन्ही फिर्यादीच्या अनुषंगाने फिर्यादी यांनी आज जिल्हा न्यायामध्ये शपथपत्र दाखल करून आरोपी संदीप कोतकर यांनी न्यायालयाने दिलेल्या जामिनाचा दुरुपयोग करून फिर्यादी यांच्या आईला धमकावले संबंधीची तक्रार दाखल झाल्याची माहिती न्यायालयाला दिली.त्याचप्रमाणे आरोपी कोतकर यांच्या जिल्हा प्रवेशामुळे नगरमधील विधानसभेची निवडणूक भयमुक्त वातावरणात होऊ शकत नसल्यासंबंधीचे विवेचन न्यायालयासमोर केले होते.
एकंदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच मूळ फिर्यादी यांच्यातर्फे केलेला युक्तिवाद लक्षत घेऊन न्यायालयाने संदीप कोतकर याचा जिल्हा बंदी उठवण्यासंबंधीचा अर्ज आज रोजी फेटाळला आहे.
सदर प्रकरणी फिर्यादी संग्राम कोतकर यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयातील ज्येष्ठ कायदेतज्ञ उमेशचंद्र यादव-पाटील यांनी काम पाहिले तर त्यांना सहाय्य एडवोकेट समीर पटेल यांनी केले.