HomeUncategorizedधामोरी येथे कृषी दूत ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम संपन्न

धामोरी येथे कृषी दूत ग्रामीण जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम संपन्न

advertisement

अहमदनगर दि.२४ ऑगस्ट
धामोरी बु. ग्रामस्थांच्या वतीने व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषि महाविद्यालयाच्या यांच्या वतीने कृषिदूत ग्रामीण जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव च्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमासाठी डॉ. विखे पाटील कृषी महाविद्यालय व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्न कृषि महाविद्यालय विळद घाट येथील विद्यार्थी हजर होते .

कार्यक्रम समन्वयक प्रा. किरण दांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत उलाल रोशन, शिंदे, संकेत, झेंडे क्षितीज, सगळगिळे तन्मय, सातपुते ओंकार यांनी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत शेतातील माती परिक्षण, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती बीज प्रक्रिया, एकात्मिक किड व रोड व्यवस्थापन, शेतातील अवजारांचा वापर शेतीचे आर्थिक नियोजन, जनावरांचे लसीकरण आदी विषयांवर ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला. या उपक्रमातुन आधुनिक शेतीला नवी दिशा मिळेल तसेच, वेळोवळी विविध विषयांसाठी प्रात्यक्षिकांचे आयोजन करुन आधुनिक शेती तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहोत अशी ग्वाही ग्रामस्थांना कृषिदुत यांनी दिली.

या उपक्रमासाठी प्राचार्य डॉ. एम.बी. धोंडे उपप्राचार्य, प्रा. डॉ. एस. बी. राऊत, प्रा. डॉ. एच. एल. शिरसाठ, प्रोग्रॅम ऑफिसर प्रा.बी. व्ही. गायकवाड, प्रा. ठोंबरे मॅडम आणि प्रा. खेडेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी सरपंच अशोक रामदास बकरे ग्रामसेविका प्रमिला केदारी, कृषिदूत इ. उपस्थित होते.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular