अहमदनगर दि. ९ जानेवारी
अहमदनगर शहरातील कॅफे हाऊस या गोंडस नावाखाली सुरू असलेल्या अश्लील चाळे करण्यासाठीच्या छोट्या केबिन टाकून खुलेआम नंगानाच सुरू असलेल्या सहा कॅफेवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापे टाकून आठ जोडप्यांना ताब्यात घेतले होते. तर कॅफे हाऊस चालवणाऱ्या सात जणांविरोधात कोतवाली वतोफखाना पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१ (क) (क) प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय तुषार धाकराव, सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पवार, अतुल लोटके, पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, अमृत आढाव, रविंद्र घुंगासे, बाळासाहेब गुंजाळ, जालिंदर माने, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल भाग्यश्री भिटे,सोनाली साठे,उमाकांत गावडे, अरुण मोरे यांच्या पथकाने सोमवारी केली होती. या कारवाईचे नगर मधून सर्वत्र स्वागत झालेय.
मात्र स्थानिक गुन्हे शाखेने जेव्हा या कारवाईला सुरुवात केली तेव्हा झारीतील एका शुक्रचार्यने खाल्ल्या मिठाला जागत त्याच्या हद्दीतील कॉफीचालकांना व्हाट्सअप कॉल करून छापे सुरू झाले आहेत सावध राहा आपली टीम नाही असे मेसेज देऊन अनेक कॉफी चालकांना सावध केले होते. त्यामुळे अनेक कॉफी चालकांनी आपल्या कॉफी हाऊस मध्ये असलेल्या जोडप्यांना तिथून ताबडतोब निघून जाण्यास सांगितले त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत फक्त आठ जोडपे सापडले अन्यथा डझनभर जोडपे प्रत्येक कॅफे मध्ये बसलेले असतात तेही या छाप्यात हाती लागले असते मात्र एक मेसेज गेला आणि तो कॅफे चालवणाऱ्या व्यावसायिकांच्या सोशल मीडियावर असलेल्या ग्रुप वर तो मेसेज फिरवला गेल्यामुळे अनेक ठिकाणी कॅफे रिकामे झाले होते. एकीकडे स्थानिक गुन्हे शाखा कारवाई करत असताना दुसरीकडे झारीतील तो शुक्राचार्य मात्र कॅफे चालकांना माहिती देऊन खाल्ल्या मिठाला जागला होता.