Home Uncategorized मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेदरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव होणार पद...

मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेदरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव होणार पद यात्रेत सामील… तर चुलबंद ठेवून करणार पदयात्रातील मराठा बांधवांची सेवा..

अहमदनगर दि.९ जानेवारी
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून लढा देत आहेत. आता ही आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली असून त्यासाठी मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील त्यांच्या अंतरवाली सराटी या गावापासून 20 जानेवारी रोजी पदयात्रा काढणार आहेत. ही पदयात्रा जालना, बीड, आणि अहमदनगर जिल्ह्यातून पुणे मार्गे मुंबई येथे आझाद मैदानावर पोहोचणार आहे. मुंबई येथे आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसणार आहेत.

ही पदयात्रा बीड जिल्ह्यातून गेवराई मार्गे अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. पाथर्डी मार्गे ही पदयात्रा नगर शहरातून जाणार असून ज्यावेळी ही पदयात्रा नगर जिल्ह्यात येणार आहे आणि नगर शहरातून जात असताना अहमदनगर जिल्ह्यातील संपूर्ण 14 तालुक्यातून सर्व मराठा बांधव अहमदनगर शहरात या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. तसेच या पदयात्रेत सहभागी झालेल्या लाखो मराठा बांधवांची सेवा करण्यासाठी सर्व 14 जिल्ह्यातील मराठा बांधव नगर शहरात उपस्थित राहणार असून त्यासाठी नगर शहरात आज सकल मराठा समाजाच्या वतीने नियोजनाची बैठक घेण्यात आली. कोहिनूर मंगल कार्यालयात ही बैठक पार पडली असून या बैठकीत नगर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांनी एकत्र येत जालना बीड आणि इतर जिल्ह्यातून या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या बांधवांची सेवा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये नगर जिल्ह्यातील प्रतेक तालुक्यामधील मराठा बांधवांनी एक लाख लोक जेवतील असे नियोजन हाती घेतले आहे. जेवण, राहण्याची सोय ,पाणी व इतर काही गोष्टींबाबत चर्चा करण्यात आली त्यासाठी स्वयंसेवकांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

नगर शहरातून पुणे हद्दीपर्यंत ही पदयात्रा जात असताना अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव या पदयात्रेतील मराठा बांधवांची सेवा करणार आहेत. तर अनेक मराठा बांधव पुढे मुंबईकडे जाणाऱ्या या पदयात्रेत सामील होणार आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version