Homeशहरराष्ट्रवादीची गॅसबत्ती आणि उबाठाचा शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशाऱ्याला महावितरण कार्यालयाचा ठेंगा आम्ही...

राष्ट्रवादीची गॅसबत्ती आणि उबाठाचा शिवसेना स्टाईल आंदोलनाचा इशाऱ्याला महावितरण कार्यालयाचा ठेंगा आम्ही तर रोज वीज घालवणारच… सुरू असलेल्या विजेच्या खेळ खंडोबाने नागरिकांचे जीवन हैराण…

advertisement

अहमदनगर दिनांक 24 मे
अहमदनगर शहरात महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे विजेचा खेळ खंडोबा होत असून कडक उन्हाळ्यात नागरिकांना वीज वितरण कंपनीच्या या कारभारामुळे मनस्ताप होत आहे.वीज कधी येईल आणि कधी जाईल याची आता वेळच राहिलेला नाही. दिवसातून न मोजता येईल इतका वेळ वीज येते आणि जाते त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना या वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे मनस्ताप भोगण्याची वेळ आली आहे.

अहमदनगर शहरातील बहुतांश भागात असाच प्रकार सुरू असून क्षणात वीज येते अनेक क्षणात जाते असा प्रकार सुरू आहे. या अचानक येणाऱ्या विजेमुळे आणि जाणाऱ्या विजेमुळे झटका बसून अनेक घरातील वीज उपकरणे खराब झालेले आहेत आणि विशेष म्हणजे महावितरण कार्यालयाच्या कोणत्याही कार्यालयातील फोन नंबरला फोन लावला तर तो लवकर उचलला जात नाही उचलला तर व्यवस्थित उत्तर दिली जात नाहीत ही वस्तुस्थिती आहे.

शहरात सुरू असलेल्या विजेचा खेळखंडोबा होऊ नये म्हणून सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आणि विरोधी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने नुकतेच अधीक्षक अभियंता यांना मेणबत्ती आणि गॅस बत्ती देऊन निषेध केला होता तर शिवसेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतरही विजेचा खेळ खंडोबा सुरू असून महावितरण कंपनीने दोन्ही पक्षांच्या निवेदनांचा गांभीर्याने विचारच केलेला दिसत नाही. दोन्ही पक्षांच्या निवेदनांना महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपलीच दाखवली आहे असंच चित्र सध्या एकंदर विज वितरण कार्यालयाच्या कारभारामुळे दिसून येत आहे.

विजेच्या या खेळखंडोबामुळे नागरिकांना गर्मीचा खूप त्रास सहन करावा लागतोय. इकडे सूर्य रोजच आग ओकत असताना कुठेतरी थंडावा मिळावा म्हणून नागरिकांनी घरी वातावरणात गारवा आणण्यासाठी आधुनिक उपकरणे आणलेली आहेत. मात्र जर लाईटच नसेल तर ही उपकरणे चालवायची कशावर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या घरी इन्व्हर्टर नसते त्यामुळे या नागरिकांना कागदाचा पंखा करूनच हवा घ्यावा लागते.मात्र महावितरण कार्यालय आपला खेळ खोंडोबा थांबवणार का नाही का नागरिकांना असाच त्रास देत राहणार आणि याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना काय भूमिका घेते याकडे पाहणे गरजेचे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular