HomeUncategorizedचार जून ची वाट न पाहता उमेदवारांचे समर्थक विजयाचे फलक लावून आजच...

चार जून ची वाट न पाहता उमेदवारांचे समर्थक विजयाचे फलक लावून आजच करतायेत विजयउत्सव साजरा…

advertisement

अहमदनगर दिनांक 24 मे
लोकसभा निवडणूक संपली असून आता सर्वांना प्रतीक्षा आहे ही चार तारखेला येणाऱ्या निकालाची यावर्षी अहमदनगर दक्षिण जिल्ह्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा चांगलाच जोरदार सामना रंगला होता. महाविकास आघाडी कडून पारनेर नगर मतदारसंघाचे माजी आमदार निलेश लंके तर महायुतीकडून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची लढत झाली.शेवटपर्यंत ही लढत चांगलीच रंगत गेली होती. एकमेकारांवर होत असलेले राजकीय आरोप आणि या निवडणुकीदरम्यान झालेल्या विविध नाट्यमय घटना यामुळे ही निवडणूक चांगलीच लक्षात राहणारी ठरली आहे.

विशेष म्हणजे या निवडणुकीत अत्यंत चुरस निर्माण झाली असून अजूनही कोण निवडून येईल हे कोणीही खात्रीशीर सांगत नाहीये मात्र निलेश लंके आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे समर्थक आपला उमेदवार निवडून येणारच असा ठाम निर्णय घेऊन त्यांनी विजयाचे फलकही लावण्यास सुरुवात केली आहे. निलेश लंके यांचे जामखेड तालुक्यात आणि कर्जत तालुक्यात विजयाचे फलक लागले आहेत. तर नगर शहराच्या जवळच असलेल्या एमआयडीसी भागातही खासदार सुजय विखे पाटील यांचेही आता फिक्स खासदार म्हणून फलक झळकले आहेत उमेदवारांच्या समर्थकांनी निकालाची चार तारखेपर्यंत वाट न पाहता आतापासूनच विजयाचे बोर्ड झळकवण्यास सुरुवात केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular