Homeराजकारणलोकसभेच्या रणांगणामध्ये विखे विरुद्ध लंके अशीच लढत होणार... आमदार निलेश लंके उद्या...

लोकसभेच्या रणांगणामध्ये विखे विरुद्ध लंके अशीच लढत होणार… आमदार निलेश लंके उद्या करणार शरद पवार यांच्या गटात प्रवेश..

advertisement

अहमदनगर दि.१३ मार्च
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.आज जाहीर झालेल्या उमेदवारांच्या यादीत खासदार सुजय विखे पाटील यांचे नाव जाहीर झाले असून सुजय विखे पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपासूनच खासदारकीच्या निवडणुकीची तयारी केली होती. त्याप्रमाणे त्यांनी लोकसभा मतदारसंघात विविध तालुक्यात सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आपल्या प्रचाराची पहिली फेरी पूर्ण केली आहे.

तर याच पार्श्वभूमीवर आता सुजय विखे पाटील यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी कडून कोण अशी चर्चा सुरू असतानाच नगर पारनेर मतदारसंघाचे अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके गुरुवारी शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असून तुतारी चिन्हावर ते लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लंके विरुद्ध विखे अशी लढत पाहायला मिळेल आणि ही लढत आता चुरशीची होणार आहे.

आमदार निलेश लंके हे भाजपच्या यादीची वाट पाहत होते आज यादी जाहीर झाली आणि खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाल्याने निलेश लंके हे उद्याच शरद पवार गटात प्रवेश करणार असून तुतारी चिन्हावर ते लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी खात्रीशीर माहिती हाती येत आहे.

त्यामुळे आता लोकसभेचे खरे रणांगण उद्यापासून सुरू होईल अशी अपेक्षा नगर दक्षिण मधील मतदारांमध्ये आहे. मागील निवडणूक पेक्षा ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आमदार निलेश लंके हे लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असे तर्क वितर्क लावले जात असल्यामुळे या निवडणुकीत खरी रंगत येणार आहे.

मात्र आमदार निलेश लंके हे उद्या प्रवेश करणार असले तरी लोकसभेची उमेदवारी आमदार निलेश लंके करणार की त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके करणार हे मात्र सध्या गुपित आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular