Home Uncategorized महाराष्ट्र पोलीस ऍक्शन मोडमध्ये मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बाजवण्याचा धडाका

महाराष्ट्र पोलीस ऍक्शन मोडमध्ये मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा बाजवण्याचा धडाका

औरंगाबाद दि.१ मे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे उतरण्यासाठी चार तारखेचा अल्टिमेटम दिल्यानंतर आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले असून मनसेचे जे कार्यकर्ते पदाधिकारी सक्रिय आहेत जे आंदोलन करतात किंवा जे प्रामुख्याने आंदोलनात असतात त्यांची यादी पोलिसांनी तयार केली  होती आणि त्यांना 149 अंतर्गत नोटीस पाठवण्याची तयरी होती मात्र आता अशी माहिती मिळते की 149 144 नोटिसा देण्या बरोबर काही जणांना तीन दिवस हद्दपार करण्याचा आदेश पोलिसांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

  चार  ते सहा मे पर्यंत औरंगबाद शहरात कार्यकर्ते, पदाधिकारी यांना राहू नये आशा नोटीस दिल्या गेल्या असून या 3 दिवसांमध्ये त्यांना  त्यांच्या शहरात मध्ये राहण्यास मनाई केली आहे.

तसेच काही कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध किंवा अटक करण्या बाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय घेणे सुरू असून महाराष्ट्र पोलिसांनी औरंगाबाद, मुंबई ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद अमरावती या अनेक भागांमधून आता कार्यकर्त्यांना त नोटीस द्यायला सुरुवात केलेली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version