Homeविशेषस्व. महेन्द्र कुलकर्णी यांच्या नावाने महापालिका दरवर्षी देणार पुरस्कार; यावर्षी पासूनच पुरस्कार...

स्व. महेन्द्र कुलकर्णी यांच्या नावाने महापालिका दरवर्षी देणार पुरस्कार; यावर्षी पासूनच पुरस्कार दिला जाणार; अहमदनगर प्रेस क्लबच्या माध्यमातून केली होती मागणी

advertisement

अहमदनगर दि.२३ डिसेंबर
अहमदनगर शहरातील ज्येष्ठ संपादक आणि समाचार या वृत्तपत्राचे मालक महेंद्र कुलकर्णी यांचे हृदयविकाराने निधन झाले होते. नगर शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक जडणघडणीमध्ये ज्येष्ठ पत्रकार
दैनिक समाचारचे संपादक महेंद्र कुलकर्णी यांचे मोठे योगदान राहिले आहे. लोकमत, लोकसत्ता यासारख्या दैनिकांमध्ये काम केल्यानंतर दैनिक समाचारचे संपादक म्हणून काम सुरू होते.


एक अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात आणि नव्या पिढीसमोर त्यांचे काम आदर्शवत पद्धतीने यावे यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा आणि अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने स्व. महेंद्र कुलकर्णी स्मृती पुरस्कार’ दरवर्षी देण्यात यावा. नगर शहरात उत्कृष्ट काम करणाऱ्या पत्रकाराला हा पुरस्कार दिला जावा. अशी मागणी अहमदनगर प्रेस क्लबच्या वतीने प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी आ. संग्राम जगताप, महापौर सौ. रोहिणी संजय शेंडगे ताई, उप महापौर गणेश भोसले, आयुक्त डॉ पंकज जावळे यांना पत्र देऊन केली होती. अहमदनगर प्रेस क्लबच्या मागणीला महापालिकेकडून लगेच सकारत्मक प्रतिसाद भेटला असून यावर्षी पासून दरवर्षी पत्रकार दिनी म्हणजेच दि. 6 जानेवारी रोजी हा पुरस्कार दिला जाणार आहे. या साठीचा सुमारे एक लाख रुपये खर्च दर वर्षी महापालिका करणार आहे.अशी माहिती अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष शिवाजी शिर्के यांनी दिली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular