Homeविशेषवाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपा:महेश घावटे

वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी जपा:महेश घावटे

advertisement

अहमदनगर दि 23 डिसेंबर

:आम आदमी पक्षाचे युवा कार्यकर्ते महेश घावटे तसेच विक्रम क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 21 डिसेंबर रोजी तपोवन रोड परिसरात असणाऱ्या “बालघर’ प्रकल्पातील उपेक्षित, वंचित, शैक्षणिक क्षेत्रापासून कोसो दूर असणाऱ्या अनाथ मुलांना मिष्टान्न भोजन व ऊबदार कपड्यांचे वाटप करण्यात आले.आम आदमी पक्षाची भूमिका ही नेहमीच दात्याच्या स्वरूपात असते. या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक नागरिक हा रोजच पैश्याच्या मागे धावत असतो,परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण सुद्धा समाजाचे काही देणेकरी लागतो आणि फुल ना फुलाची पाकळी या स्वरूपात का होईना आपण गरजवंताला सतत मदत केली पाहिजे या भूमिकेतून समाजातील दुर्बल घटकांचा शोध घेऊन,सर्व सदस्य त्यांना नेहमीच मदत करत राहणार अशी शपथ कार्याध्यक्ष भरत खाकाळ,शहराध्यक्ष राजेंद्र कर्डीले यांनी सर्वांना दिली.


वय वर्ष 3 पासून वय वर्ष 15 पर्यंतची मुलं या बालघर प्रकल्पात आहेत. माझा वाढदिवस अश्या बालगोपालांमध्ये साजरा होताना मला माझ्या लहानपणीचे शाळेतले दिवस आठवले असे महेश घावटे म्हणाले. तसेच आई वडीलांची परिस्थिती कितीही हलाखीची असली तरीशिक्षणाची कास सोडू नका,आयुष्यात काय व्हायचे आहे ते उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन अभ्यास करा. पुढची दहा ते पंधरा वर्षे तुमच्या जीवनाचा पाया भक्कम करणारी आणि स्वावलंबी बनून समाजात सन्मानाने जगायला कारणीभूत होणार आहेत. चांगलं शिक्षण घ्या, डॉक्टर, अभियंता,उद्योजक, सरकारी अधिकारी व्हा आणि आपल्या आई वडिलांचे कष्टाचे चीज करा असं मार्गदर्शन महेश घावटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमावेळी केलं.


आपचे कार्याध्यक्ष रिटायर्ड सुभेदार भरत खाकाळ यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व समजून सांगितले. सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठावे,व्यायाम करावा,दिवसभर अभ्यास करावा,आरोग्य चांगले ठेवण्यासाठी योग्य आहार घ्यावा, व रात्री लवकर झोपावे.शिस्त हा जीवनाचा एक अविभाज्य घटक असून लहानपणापासून जर शिस्तीची सवय लागली तर पुढील आयुष्यातील येणारे अडथळे आपोआपच दूर होतात.आई वडील आणि गुरू यांचे स्थान आयुष्यात खूप महत्वाचे असते त्यामुळे त्यांनी केलेल्या संस्कार आणि उपदेशांचे पालन करायला शिका असे खाकाळ म्हणाले.


कुणाला आई नाही तर कुणाला वडील, दोघेही असले तरी खायची पंचाईत,अठरा विश्व दारिद्र्य.बोटभर कापड घ्यायचं म्हटलं तर पैसे नाहीत,मुलाबाळांच्या अश्या परिस्थितीमध्ये असणारी जवळपास 35 मुलं नगरमधील बालघर प्रकल्पांत शिक्षण घेत आहेत.


सामाजिक कार्यकर्ते युवराज गुंड सर जानेवारी 2017 पासून हा प्रकल्प स्वखर्चाने चालवीत आहेत.35 मुलांचा दररोजचा कमीत कमी खर्च साधारण सात ते आठ हजार रुपये असल्याची माहिती मिळाली.कुठलेही सरकारी अनुदान नसल्याने दात्यांच्या मदतीवरच संस्थेची गुजराण असते.गुंड यांनी सर्वप्रथम वंचित मुलांना स्वतःच्या घरी सांभाळायला सुरुवात केली परंतु मुलांची संख्या वाढायला लागल्यानंतर मात्र त्यांना शहरांत यावे लागले. आपण आपल्या वाढदिवसाच्या निमिताने पारट्यांच्या माध्यमातून होणारा हजारोंचा खर्च,तसेच आपल्या जवळील व्यक्तींचे पुण्यस्मरण,वर्षश्राद्ध ई निम्मित होणारा खर्च थोड्याफार प्रमाणात वाचवून जर अश्या समाजसेवी संस्थेला मदत केली तर दिवंगत व्यक्तीला खरी श्रद्धांजली होईल.आपल्या हातून समाजसेवेचे अनमोल कार्य घडून एक वेगळी आत्मशांती मिळेल म्हणून दानशूर व्हा आणि जसं जमेल तसं दुसऱ्याला देत राहा अस आवाहन महेश घावटे यांनी केलं.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular