Homeशहरबाळासाहेबांची शिवसेनेच्या नागरसेवकांसह विरोधी पक्षाच्या नागरसेवकांवर जिल्हा नियोजन मार्फत आलेल्या निधी वाटपात...

बाळासाहेबांची शिवसेनेच्या नागरसेवकांसह विरोधी पक्षाच्या नागरसेवकांवर जिल्हा नियोजन मार्फत आलेल्या निधी वाटपात केला जातोय अन्याय नगरसेवकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

advertisement

अहमदनगर दि.२३ डिसेंबर

अहमदनगर महानगरपालिकेला जिल्हा नियोजन मार्फत मिळत असलेल्या निधीमध्ये काही नगरसेवकांना डावल जात असल्याची तक्रार अहमदनगर महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे केली आहे यामध्ये प्रामुख्याने बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नगरसेवकांना डावलत असल्याची तक्रार बाळासाहेबांची शिवसेनेचे शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांच्यासह नगरसेवक अनिल शिंदे नगरसेविका अश्विनी सचिन शिंदे नगरसेवक अक्षय उनवणे नगरसेवक आसिफ सुलतान नगरसेवक सुभाष लोंढे नगरसेवक संग्राम शेळके नगरसेविका रिझवाना शेख या नगरसेवकांनी केली आहे.

जिल्हा नियोजन समिती मधुन आर्थिक वर्ष सन २०२२-२०२३ या वर्षामध्ये जिल्हा नियोजन समिती मधून दलित वस्ती व दलितेतर व जिल्हास्तर या लेखाशिर्षातून महानगरपालिकेला निधी प्राप्त झाला आहे. अहमदनगर महानगरपालिकेचे एकुण ६८ नगरसेवक निवडून आलेले आहेत मात्र महासभेमध्ये महापौरांना अधिकार दिल्याने ते कामे सुचवितील ते बजेट रजिष्टर मध्ये त्याची नोंद केली जाते. त्या ठिकाणी इतर विरोधी नगरसेवकांना कुठलाही निधी वितरण करण्यात येत नाही. त्यामुळे त्या प्रभागामध्ये त्या नगरसेवकांना नागरिकांच्या रोषास जावे लागते. ज्यावेळेस २५ वी घटना दुरुस्ती झाली त्याच्यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळाला पाहिजे. परंतु ह्या महानगरपालिकेमध्ये इतर विरोधी नगरसेवकांना असा कुठलाही न्याय मिळत नाही. आणि त्यांचे कुठलेही प्रभागामध्ये काम केले जात नाही त्यामुळे सर्व नगरसेवकांना आपण जो निधी प्राप्त करून दिला आहे तो निधी समसमान मिळण्यात यावा. अशी मागणी या नियोजनात करण्यात आले आहे अन्यथा याबाबत मुख्यमंत्री आणि  प्रधान सचिव, नगर विकास विभागाकडेस यांचेकडे देखील तक्रार करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular