Homeराजकारणनगरसेवक मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून कांबळे मळा रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न....

नगरसेवक मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून कांबळे मळा रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न. नगरसेवक मनोज कोतकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रभागातील विकासकामे मार्गी लागत आहे – आ.संग्राम जगताप.

advertisement

अहमदनगरव23 डिसेंबर  –
केडगाव हे तळमळ्याचा परिसर असलेले उपनगर आहे वाड्यान वस्त्यांपर्यंत विकासाची काम घेऊन जाण्याचे काम नगरसेवक मनोज कोतकर यांनी केले आहे. विकास कामांच्या निधीसाठी पाठपुराव्याची आवश्यकता असते ते काम नगरसेवक मनोज कोतकर यांनी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला आहे.केडगाव हे नगर शहराचे सर्वात मोठे उपनगर आहे विकास कामांमुळे नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत या भागांमध्ये मूलभूत प्रश्नांपासून नियोजनबद्ध व कायमस्वरूपी विकासाचे काम केले जात आहे. कांबळे मळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक राहत आहेत. कांबळे मळा परिसरातील रस्ता डांबरीकरणाचे काम मार्गी लागल्यामुळे रहदारीचा प्रश्न सुटला आहे असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी केले.
नगरसेवक मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून कांबळे मळा येथील रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी आ.संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे मा. सभापती अविनाश घुले, मा. नगरसेवक महेंद्र कांबळे, मा. नगरसेवक सुनीता कांबळे,सुरेश बनसोडे, सोनू घेंमुड, बाजार समितीचे संचालक शाम कोतकर, आकाश शिंदे, अण्णा शिंदे, सुहास साळुंके, राजू कोतकर, जालिंदर कोतकर, रोनीत सुनील कोतकर, उमेश ठोंबरे, संदीप लांडगे, योगेश कांबळे, बालू गुंजाळ, केशव ठुबे, रंजीत ठूबे, किशोर ठूबे, विनोद वाडेकर, संचित राऊत, भरत मतकर, ,कमल शिंदे, छाया कांबळे, सविता गायकवाड, विलास सोनवणे, वैभव पंडित, दत्ता शिंदे,आदि नागरिक उपस्थित होते.
नगरसेवक मनोज कोतकर म्हणाले की, केडगाव मधील कांबळे मळा येथील रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित होते ते काम मार्गी लागण्यासाठी आमदार संग्राम जगताप व स्थायी समितीचे मा. सभापती अविनाश घुले यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर तातडीने निधी उपलब्ध झाला व रस्त्याचे कामही मार्गी लागले प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. टप्प्याटप्प्याने सर्व विकासकामे मार्गी लावली जातील नियोजनबद्ध विकास कामांमुळे प्रभागाचा नक्कीच कायापालट होईल प्रभागातील नागरिकांचे विकास कामांमध्ये सहकार्य लाभत असते असे ते म्हणाले.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular