मुंबई दि.२७ जानेवारी
मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्याचे मंत्री दिपक केसरकरांनी सांगितलं आहे. मनोज जरांगे यांनी आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केली होती. ही चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती आहे. तर जरांगे यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
मंत्री दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की, “मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे संवेदनशील आहेत. ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील. आता मागण्या तर मान्य झाल्या. पण, त्याची अमंलबजावणी ही शासकीय विहीत नियम असतात त्याप्रमाणे होत असते. पंरतु महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं आहे की, आत्तापर्यंत आपण ३७ लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ शकलो. आता ही नवी प्रकिया पुर्ण केल्यानंतर ही संख्या ५० लाखांच्या वरती जाणार आहे. त्यामुळे हा न्याय मिळवण्यामध्ये मनोज जरांगेंची भूमिका आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो”.
वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मनोज जारांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून उपस्थित मराठा बांधवाना संबोधित करणार आहेत. यासाठी सकाळ पासूनच वाशी येथील शिवाजी चौकामध्ये मराठा समाजाचा जनसागर लोटला आहे. मनोज जारांगे पाटील काय संबोधित करणार आहे. याकडे मराठा बांधवाचे लक्ष लागून राहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत..
सरकारच्या शिष्टमंडळासोबतची रात्री बैठक सुरू होती पहाटे तीन वाजेपर्यंत ही बैठक सुरू होती. मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या या बैठकीत मागण्या करण्यात आल्या असून त्याबाबतचे अध्यादेशही सरकारने काढले आहेत. आता मागण्या पूर्ण झाल्यानंर मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवाजी चौकात विजयी सभा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांचे उपोषण सोडण्यासाठी जाणार असून वाशि मध्ये विजयी सभा होणार आहे अंतरवाली पेक्षा ही सभा मोठी होणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले अंतरवालीसह राज्यातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश सरकारने दिले असून मराठवाड्यातील नोंदणीसाठी गॅजेट काढणार असल्याचेही सरकारने सांगितले आहे. सगेसोयरे बाबत सरकारने अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे सर्व मान्य मागण्या झाल्यानंतर आता फक्त विजयाचा गुलाल घेण्याची बाकी राहिले आहे.