Homeशहरमनोज जरांगे पाटील मुंबई कडे निघाले...त्यांच्या सोबत हजारो मराठे मुंबई कडे..

मनोज जरांगे पाटील मुंबई कडे निघाले…त्यांच्या सोबत हजारो मराठे मुंबई कडे..

advertisement

अहमदनगर दि.२५ फेब्रुवारी
मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आक्रमक झाले असून सध्या राज्यात तीन पायांचे सरकार आहे त्यामधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ठार मारण्याचा डाव आखला असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आज अंतरवली सराटी येथे आरक्षणाबाबत मराठा बांधवांची बैठक घेण्यात आली होती यावेळी मनोज जलांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

जर माझा जीवच घ्यायचा असेल तर मीच मुंबईवर सागर बंगल्यावर येतो असे आव्हान करत मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहेत त्यांच्याबरोबर हजारो मराठे आता मुंबईकडे रवाना होत असून मनोज जरांगे पाटील यांनी सर्वांना शांततेचे आवाहन करत मी एकटाच जातोय तुम्ही इथेच थांबा असेही सांगितलं मात्र आता हजारो मराठे मुंबईकडे हळूहळू रवाना होण्यास सुरुवात झाली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सह्याद्री अतिथी गृहाकडे रवाना झाले असून थोडा वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक सुरू होणार आहे राज्यातील कायदा आणि सुव्यासस्थेबाबत या ठिकाणी चर्चा होऊ शकते तसेच मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत समजूत कशी काढायची या खलबत्ता होऊ शकतात.

मनोज जरंगे पाटील सध्या जालना जिल्ह्यातील भांबोरी गावात पोहोचले असून भांबोरी गावातील महिलांनी मनोज जरांगे पाटील यांना पुढे जाऊ नये अशी विनंती केली आहे आपण आधी उपचार घ्यावेत आणि नंतर मुंबईकडे जावे अशी विनवणी महिलांनी जरांगे पाटलांकडे केली आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular