HomeUncategorizedमनोज जरांगे पाटील मुंबई कडे रवाना..पोलीस प्रशासन अलर्ट ..नगर पाथर्डी रोड वर...

मनोज जरांगे पाटील मुंबई कडे रवाना..पोलीस प्रशासन अलर्ट ..नगर पाथर्डी रोड वर प्रचंड पोलीस बंदोबस्त..

advertisement

अहमदनगर दिनांक २५ फेब्रुवारी
मनोज भरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केल्यानंतर आता राज्य सरकार चांगले अलर्ट झाले आहेत. मुंबईमध्ये वेगाने चक्र फिरत असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची सह्याद्री अतिथी गृह येथे बैठक सुरू आहे तर महाराष्ट्रातील मराठा बांधव हे मुंबईकडे निघालेले आहेत.


अहमदनगर शहरातील नगर पाथर्डी रोडवर चांदबिबी महालाच्या पायथ्याशी अहमदनगर जिल्हा पोलीस दलाने प्रचंड पोलीस बंदोबस्त लावला असून या ठिकाणी जवळपास दोनशे पोलीस कर्मचाऱ्यांचा फौज फाटा बंदोबस्तासाठी लावण्यात आला आहे.
अहमदनगर शहराचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्यासह कोतवाली पोलीस स्टेशन, तोफखाना पोलीस स्टेशन, एमआयडीसी, भिंगार, पोलीस स्टेशन मधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित आहेत.
पोलिसांनी बॅरिकेट्स आणले आहेत मात्र ते रोडवर अद्यापही लावण्यात आलेले नाहीत आदेश येऊ पर्यंत हा पोलीस बंदोबस्त असाच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular