Homeक्राईमआरटीओ कार्यालयात एजंटचा कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला ....व्हिडिओ व्हायरल... एजंटांची दादागिरी किती काळ......

आरटीओ कार्यालयात एजंटचा कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला ….व्हिडिओ व्हायरल… एजंटांची दादागिरी किती काळ… टाळी एका हाताने वाजत नाही चूक दोन्ही बाजूंनी असणारच…

advertisement

अहमदनगर दि.२४ नोव्हेंबर
प्रदेश उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि त्या ठिकाणी असलेले एजंट यांची चर्चा अनेक वर्षांपासून काहीना काही कारणामुळे नेहमीच होत असते. उपप्रादेशिक परिवहन कार्यातील काम हे त्या ठिकाणी असलेल्या एजंट शिवाय होऊ शकत नाही असाच काहीसा कायदा आणि नियम करून ठेवलेला आहे. यावर अनेक वेळा टीका होते अनेक चर्चा होतात मात्र त्यावर पुढे कार्यवाही कधीच झालेली समजत नाही. यामुळेच एजंट आणि उप प्रादेशिक कार्यालयाधील कर्मचारी यांच्या मध्ये एक वेगळं नातं निर्माण झाले आहे.मात्र या नात्यात थोडी जरी चूक झाली तर एकमेकांच्या जीवावर उठण्याच्या घटनाही घटना घडल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एका एजन्टने उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्याने त्याच्या कागदावर सही केली नाही या कारणामुळे थेट हत्यार आणून त्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.हुफेज जमादार आणि त्याच्याबरोबर असलेल्या सात ते आठ लोकांनी थेट उपप्रादेशिक कार्यालयात येऊन कर्मचाऱ्यावर हल्ला केल्यामुळे हा एक चांगलाच चर्चेचा विषय झाला असून यामुळे आणखी एक प्रश्न समोर आला आहे की एजंटांची एवढी हिंमत कशामुळे होते की ते थेट एखाद्या कर्मचाऱ्यावर कार्यालयात येऊन हल्ला करतात.त्यामुळे टाळी एका हाताने वाजत नाही याप्रमाणे चूक दोन्हीही बाजूंची असू शकते त्यामुळे हा हल्ला एका कर्मचाऱ्यावर नसून संपूर्ण उपप्रादेशिक परिवर्तन परिवहन कार्यालयावर झाला आहे. त्यामुळे एजंटगिरी पासून परिवहन कार्यालय मुक्त करा अन्यथा असे हल्ले होतच राहणार आणि मग ते हल्ले पचवण्याची ताकद अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ठेवायला हवी.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular