HomeUncategorizedनगर दक्षिण चे खासदार उत्तरेत साखर वाटतात नगरकरांची दिवाळी कडू करणाऱ्या खा....

नगर दक्षिण चे खासदार उत्तरेत साखर वाटतात नगरकरांची दिवाळी कडू करणाऱ्या खा. विखेवर शिवसेनेचे विक्रम राठोड यांची टीका

advertisement

अहमदनगर दि .८ नोव्हेंबर

नगर दक्षिण खासदारकीच्या निवडणुकीत उपरा उमेदवार म्हणून आलेले सुजय विखे हे नगर
उत्तरेत त्यांच्या शिर्डी लोकसभा मतदार संघात साखर वाटत फिरत आहेत. प्रत्यक्षात त्यांनी नगर दक्षिणेत साखर वाटणे अपेक्षित होते. मात्र नगर दक्षिण चे खासदार उत्तरेत साखर वाटतात तेव्हा दक्षिण नगर करांची दिवाळी कडू करताना उत्तरेला दिवाळी आणि नगरला काय शिमगा आहे का असा सवाल विचारात युवा सेनेचे प्रदेश उपप्रमुख माजी नगरसेवक विक्रम अनिलभैया राठोड यांनी विचारला आहे.

याबाबत एक पत्रक त्यांनी प्रसिद्धीला दिले आहे.
नगर दक्षिण चे खासदार म्हणून ‘ तिकिटावर निवडणूक लढविताना तुम्हाला गोड वाटले. परंतु निवडून आल्यानंतर प्रत्येक दिवाळी आपण उत्तरेतील जनतेबरोबर साजरी करता त्यांच्या सुखदुःखात सहभागी होतात. त्यांचे प्रश्न अडीअडचणी प्राधान्याने सोडवता मग नगर दक्षिण विषयी सापत्न भाव का ठेवता. त्या निवडणुकीत शिवसेनेने देखील आपला मनापासून प्रचार केला. आपल्याला घराघरात आणि मनात पोहोचवून तुम्हाला मोठे मताधिक्य दिले. परंतु आपण वेळोवेळी नगर दक्षिण लोकसभा मतदार संघावर अन्यायच केला. नगर चा निधी शिर्डीला वळवला. आता साखर देखील तिकडेच वाटत आहात. मध्यंतरी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह याना नगरला न आणता शिर्डीला आणले. शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आणि देखील नगरच्या जिल्हा मुख्यालयात व्हायला हवा होता पण तो देखील तिकडेच साजरा केलात.

मागे पशु दुग्धविकास मंत्रालयाचे राष्ट्रीय पातळीवरील पशु प्रदर्शन आपण शिर्डीलाच घेतले. समृद्धी महामार्ग आपल्या मतदार संघातून नेत असताना नगर कोपरगाव रस्ता तसाच वाऱ्यावर सोडला. आपण नगर पुणे इंट्रासिटी रेल्वेसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. निदान शिर्डी मुंबई तरी नगर पुणे मार्गे सुरु करा. कर्जत जामखेडला एम आय डी सी सुरु होऊ
देण्याऐवजी आपण तिला विरोधच केलात. उलट उत्तरेला एम आय डी सी दिली. विमानतळ करताना देखील आपण नगर दक्षिण मतदार संघाला प्रधान्य दिले नाही. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शाशकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे प्रस्तावित असताना नगर शहराचा प्रस्ताव कुठे गायब झाला याची उत्तरे आपण द्यावीत आणि नरक यातना भोगत असलेल्या नगर दक्षिणेतील जनतेचा कडू घास काढण्यासाठी तरी नगरला यावे असा टोला त्यांनी लगावला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular